Dog |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Latest News: गोव्यातील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचे प्रमाण खूपच कमी ; कुत्र्यांची संख्या वाढली

Goa Latest News: काळजीबाबत सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे

दैनिक गोमन्तक

Goa Latest News: राज्यातील मानवी लोकसंख्येच्या तुलनेत भटक्या कुत्र्यांची टक्केवारी 9 टक्के आहे जी जागतिक सरासरीच्या 4 पटीने आहे. हल्लीच काही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने या कुत्र्यांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे धोरण आदेशात नमूद केले होते त्याची अंमलबजावणी करत राज्य सरकारने त्याची अधिसूचना जारी केली आहे.

गोव्यात 2014 साली लोकसंख्येच्या तुलनेत 3 टक्क्यांवरून ती 9 टक्क्यांवर पोहोचली आहे. यावरून गोव्यातील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचे प्रमाण खूपच कमी असल्याचे दर्शवत आहे.

ही धोरण मार्गदर्शक तत्त्वे काही स्थानिक बदलांसह दिल्ली उच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहेत. निवास कल्याण संघटनेतर्फे (आरडब्ल्यूए) किंवा नगरपालिका किंवा पंचायत यांच्याशी सल्लामसलत करून जिल्हा सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स (डीएसपीसीए) द्वारे नियुक्त केलेल्या क्षेत्रांमध्ये समुदाय कुत्र्यांना आहार देणे आवश्यक आहे.

पाळीव प्राण्यांच्या मालकांना मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्वच्छता राखण्यासाठी कोणत्याही शौचास साफ करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय खाते आणि राज्य देखरेख समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांना 70 टक्के भटक्या कुत्र्यांच्या (वार्षिक वाढीसह) नसबंदीची खात्री पुढील 5 वर्षांत करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT