ACGL workers strike Called off Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्र्यांकडून ‘एसीजीएल’ कामगारांना तात्पुरता दिलासा..

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : कामगारांच्या संपाला तात्पुरती स्थगिती

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले : गेल्या पाच दिवसांपासून पगारवाढीचा मुद्द्यावरून संपावर गेलेल्या एसीजीएल (ACGL) कंपनीच्या कामगारांना मुख्यमंत्र्यांनी मंगळवारपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कामगार संघटनेने पुकारलेला संप मागे घेऊन त्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आज सायंकाळी पाच दिवसांच्या संपाची सांगता करताना पत्रकारांना सांगण्यात आले.

‘एसीजीएल’ कंपनीच्या कामगारांच्या पगारवाढीचा मुद्द्यावर कोणताच तोडगा निघाला नसल्याने कामगार 18 तारखेपासून पाच दिवस संपावर गेले होते. त्यामुळे कंपनीचे संपूर्ण कामकाज बंद होते. या काळात कामगारांच्या वतीने वाळपई तसेच साखळी शहरात मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. या संपाला राज्यातील विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला होता. याची दखल घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेऊन गुरुवारी रात्री कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

कंपनी व्यवस्थापनाशी करणार चर्चा

याप्रकरणी आपण मंगळवारपर्यंत कंपनीच्या व्यवस्थापनाशी बोलणी करून तोडगा काढू, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा मान राखून गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला संप स्थगित करीत असल्याची माहिती एसीजीएल कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण यांनी आज संध्याकाळी दिली. यावर कामगार संघटनेने समाधान मानून मंगळवारपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT