Goa Accidents: गोव्यातील रस्ते हे रस्ते कमी आणि मृत्यूचे सापळेच अधिक वाटण्यासारखी परिस्थिती आहे, रस्ते अपघाताच्या आकडेवारीतून दिसून येत आहे.
यंदाच्या वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत राज्यात 2365 अपघात झाले असून त्यात 228 जणांचा मृत्यू झाला आहे, परिवहन विभागानेच ही आकडेवारी जाहीर केली आहे.
या आकडेवारीनुसार, जानेवारीत सर्वाधिक 39 जणांचा अपघाती मृत्यू झाला. जानेवारीत 272 अपघात झाले होते.
फेब्रुवारीत 232 अपघातांत 27 मृत्यू, मार्चमध्ये 246 अपघातांत 30 मृत्यू, एप्रिलमध्ये 231 अपघातांत 27 मृत्यू, मे महिन्यात 261 अपघातांत 19 मृत्यू, जूनमध्ये 231 अपघातांमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
जुलैमध्ये झालेल्या 209 अपघातांमध्ये 24 जणांचा मृत्यू झाला, ऑगस्टमध्ये 232 अपघातांमध्ये 13 जणांचा मृत्यू, सप्टेंबरमध्ये 227 अपघातांमध्ये 16 जणांचा मृत्यू तर ऑक्टोबरमध्ये 224 अपघातांमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या 224 अपघातांपैकी 116 अपघात दक्षिण गोव्यात तर 108 अपघात उत्तर गोव्यात झाले आहेत. यातील 15 प्राणघातक अपघात होते.
22 अपघातात गंभीर दुखापती झाल्या आहेत. 41 अपघातांमध्ये किरकोळ जखमी झाले आहेत आणि 146 अपघातांमध्ये कोणतीही दुखापत झाली नाही.
15 प्राणघातक अपघातांपैकी 8 दक्षिण गोव्यात तर 7 उत्तर गोव्यात नोंदवले गेले आहेत. या 15 अपघातांमध्ये 16 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 10 दुचाकीस्वार, दोन दुचाकीच्या मागच्या सीटवर बसलेले होते, एक चालक, दोन पादचारी आणि एका प्रवाशाचा समावेश आहे.
224 अपघातांमध्ये 392 वाहनांचा समावेश आहे. यात बस (13), मिनी बस (2), ट्रक (17), टँकर (3), टेम्पो (10), जीप (8), कार (160), पिक-अप व्हॅन (8), तीन चाकी (7), दुचाकी (158) आणि अनोळखी सहा वाहने होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.