midnight road accident Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: वाहने चक्काचूर, टायर हवेत उडाला! पणजीत मध्यरात्री भीषण अपघात; तामिळनाडूच्या चालकाची 'अल्कोमीटर' चाचणी होणार

Goa accident Panaji: तामिळनाडू नोंदणीकृत असलेल्या या कारने रस्त्यावरील एक टॅक्सी आणि दुचाकीला जोरदार धडक दिली.

Akshata Chhatre

पणजी: गोव्याची राजधानी पणजीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एका भरधाव लक्झरी कारने भीषण अपघात घडवून आणला. तामिळनाडू नोंदणीकृत (TN) असलेल्या या कारने रस्त्यावरील एक टॅक्सी आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एक महिला आणि अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) दाखल करण्यात आले आहे.

अपघाताचा थरार आणि भीषणता

मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, हा अपघात दिवजा सर्कलपासून हिरा पेट्रोल पंपाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर घडला. धडक इतकी भीषण होती की, लक्झरी कारचा एक टायर निखळून थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडला. धडकेमुळे एका पर्यटकाची टॅक्सी आणि काही चारचाकी वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. वाहने एकमेकांवर आदळल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले असून रस्त्यावर काचांचा खच पडला होता.

चालकाचा दावा: समोरून आलेल्या 'हाय-बीम'मुळे गोंधळलो

अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, लक्झरी कार चालकाने असा दावा केला आहे की, समोरून येणाऱ्या एका वाहनाच्या 'हाय-बीम' हेडलाईटच्या प्रखर प्रकाशामुळे त्याचे डोळे दिपले आणि त्याचा कारवरील ताबा सुटला. मात्र, धडकेची तीव्रता पाहता कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पोलीस कारवाई आणि अल्कोमीटर चाचणी

अपघाताची माहिती मिळताच पणजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला. हा अपघात केवळ चुकीमुळे झाला की चालक मद्यधुंद अवस्थेत होता, हे तपासण्यासाठी पोलीस चालकाची 'अल्कोमीटर' चाचणी करणार आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे समजते. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत केली असून अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Winter Session: मुरगाववासीयांचा पाणीप्रश्न मिटणार! 443 कोटींचा जलप्रकल्प एप्रिलपर्यंत पूर्ण होणार; मंत्री सुभाष फळदेसाईंची ग्वाही

Goa Winter Session 2026: "पर्रीकरांचा शब्द विसरलात का?" कोळसा प्रश्नावरुन विरोधकांचा विधानसभेत एल्गार; सावंत सरकारला धरले धारेवर

डिलिव्हरी बॉयचा जीव धोक्यात घालणं थांबवा! '10 मिनिटांत डिलिव्हरी' देण्याच्या दाव्यांवर सरकारची बंदी

Goa Assembly Live: "मच्छीमार पेले विनामूल्य जीव वाचवतात"- विजय सरदेसाई

Crime News: धक्कादायक! मायणा- कुडतरीत अल्पवयीन मुलीवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

SCROLL FOR NEXT