Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

वास्को, मडगावात दोन दुचाकी अपघात; नौदल कर्मचारी आणि आसामच्या मजुराचा मृत्यू

राज्यात झालेल्या दोन दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

Pramod Yadav

Goa Accident: गोव्यात सध्या मुसळधार पावासाने कहर घातला आहे. त्यामुळे होणाऱ्या पडझड आणि पाणी साचण्याच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, राज्यात झालेल्या दोन दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. वास्को येथील दुचाकी अपघातात नौदल कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, मडगावात झालेल्या अपघातात आसाम येथील मजुराचा मृत्यू झाला आहे.

वास्को येथील अपघात

वास्को येथील दुचाकी अपघातात नौदल कर्मचारी रोहित चौधरी यांचा मृत्यू झाला आहे.

एचक्यू हॉटेलजवळ रोहित यांचा अपघात झाला, येथे असलेल्या दुभाजकाला दुचाकी धडकून रोहित गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्यांचा मृत्यू झाला.

मडगाव येथील अपघात

वार्काहून बाणावलीच्या दिशेने जाताना गतिरोधकावर तोल जाऊन दुचाकी चालक प्रमोद करकट्टे (वय 28, रा. आसाम) याचा अपघात झाला. करकट्टे हा वार्का परिसरात रोजंदारीवर काम करीत होता. काम संपल्यानंतर तो बाणावली येथील राहत्या घरी जात असताना त्याचा अपघात झाला.

उपचारासाठी त्याला मडगाव येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले, दरम्यान गंभीर जखम असल्याने त्याला गोमेकॉत दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मुंबई इंडियन्सचा 'विजयी शंखनाद'; रोहित, हार्दिक आणि सूर्या एकाच मंचावर, सहाव्या ट्रॉफीसाठी शड्डू ठोकला!

Horoscope: करिअरमध्ये येणार यशाची लाट! या आठवड्यात 3 राशींच्या नशिबात सुवर्णयोग, पदोन्नतीसह पगारात होणार मोठी वाढ

Viral Video: लग्नाच्या मांडवात रंगला 'दहीहंडी'चा थरार! वरमाला घालताना नवरदेव-नवरीची कसरत पाहून पाहुणेही चक्रावले, व्हिडिओ तुफान व्हायरल

VIDEO: 8 चौकार, 7 षटकार... IPL 2026 पूर्वी अभिषेक शर्माचा 'रुद्र अवतार', 42 चेंडूत ठोकल्या 94 धावा, पाहा व्हिडिओ

VIDEO: ..अन बघता बघता काजूबागेत आग पसरली! विर्नोडा परिसरात धुराचे साम्राज्य

SCROLL FOR NEXT