Siolim Marna accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: शिवोली-मार्णा मार्गावर अपघाताचा थरार! चिरेवाहू ट्रकने दोन गाड्यांना उडवले, सुदैवाने जीवितहानी टळली

Siolim Marna Road Accident: उत्तर गोव्यातील शिवोली-मार्णा या मुख्य रस्त्यावर गुरुवारी एका भरधाव ट्रकने भीषण अपघात घडवला

Akshata Chhatre

शिवोली: उत्तर गोव्यातील शिवोली-मार्णा या मुख्य रस्त्यावर गुरुवारी (दि.२३) एका भरधाव ट्रकने भीषण अपघात घडवला. बांधकामासाठी लागणारे मोठे चिरे (दगड) घेऊन जाणारा हा ट्रक म्हापशाकडून शिवोलीकडे येत असताना चालकाचा ताबा सुटला आणि त्याने समोरून येणाऱ्या एका टॅक्सीला आणि खाजगी कारला जोरदार धडक दिली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी, दैवत बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.

अपघाताची थरारक घटना

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, म्हापशाकडून येणारा हा अवजड ट्रक वेगात होता. मार्णा येथील वळणावर ट्रकने रस्ता सोडून समोरून येणाऱ्या टॅक्सीला आणि त्यानंतर एका खाजगी कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रक आणि त्यातील एक कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घराच्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळली. धडकेमुळे भिंतीचा मोठा भाग कोसळला असून दोन्ही चारचाकी वाहनांच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती!

ज्या वेळी हा अपघात झाला, त्यावेळी रस्त्यावर आणि वाहनांमध्ये लोक उपस्थित होते. धडक बसलेली टॅक्सी आणि खाजगी कारमधील प्रवाशांच्या दृष्टीने हा काळ जणू साक्षात मृत्यूला पाहण्यासारखा होता. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे इतका मोठा अपघात होऊनही कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

धडक बसताच परिसरातील स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावले आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. "नशिबाने कोणाचाही जीव गेला नाही, अन्यथा आज मोठी शोककळा पसरली असती," अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.

पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल अपघाताची माहिती मिळताच हणजूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे शिवोली-मार्णा मार्गावर काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला.

ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडला का, याचा सविस्तर तपास आता पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे रस्त्यावरील अवजड वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT