Accident  Dainik Gomantak
गोवा

Pernem News : कोनाड येथे महिंद्रा ट्रॅक्सला अपघात; अकरा जखमी

Pernem News : चालकाचा ताबा सुटला; वाहनाचे नुकसान

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem News : पेडणे, कोनाड येथील घाटाच्या उतरणीवर (प्राथमिक शाळेजवळ) गुरुवारी (ता.१८) रात्री ११.३० वाजता महिंद्रा टेम्पो ट्रॅक्सच्या चालकाचा ताबा गेल्याने ट्रॅक्स रस्त्यापासून सुमारे बारा मीटर खाली पडून झालेल्या अपघातात अकराजण जखमी झाले.

अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अपघातात जखमी झालेले सर्वजण मूळ बिहार राज्यातील असून बांदा (सिंधुदुर्ग) येथे भूमीगत गॅसवाहिनीचे काम करतात. हरमल येथून रात्रीच्यावेळी टीएम-११-ए-३६६७ या क्रमांकाच्या टेम्पो ट्रॅक्समधून बांदा येथे जाताना हा अपघात घडला.

वाहनाची धडक प्रथम आंब्याच्या झाडाला बसली व त्यानंतर दुसऱ्या झाडाला धडक देत टेम्पो ट्रॅक्स रस्त्याच्या खाली कोसळली. अपघातामुळे झालेला मोठा आवाज व अपघातात सापडलेल्यांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक लोकांनी घटनास्थळी येऊन जखमींना मदतकार्य केले.

अपघातात जखमी झालेल्या काहींची नावे विकास रवींद्र कुमार, सुजित चौधरी, अमित कुमार, संतोष कुमार, अशोक सहाब, बलराम कुमार, शिवकुमार राय व प्रकाश कुमार अशी आहेत. तर इतर काहीजणांची नावे मिळू शकली नाहीत.

१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना प्रथम पेडणे सरकारी इस्पितळात व त्यानंतर म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: गोव्यापेक्षा थायलंडला पसंती! टॅक्सी माफिया, महागडे हॉटेल्सचा पर्यटनाला फटका?

Rashi Bhavishya 7 November 2024: मेहनतीचं फळ मिळण्याचा आजचा दिवस, नातेवाईकांच्या भेटीचाही योग; जाणून घ्या काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य

Goa Eco Sensitive Zone: 'त्या' 21 जैवसंवेदनशील गावांची पाहणी करणार केंद्रीय समिती; बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांना वेळ आहे का? मंत्रालयाकडून विचारणा

Gomantk Bhandari Samaj: भंडारी समाज समितीचे आज ठरणार भवितव्य; ‘जैसे थे’ स्थिती असतानाही घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Cash For Job Scam: कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणी विरोधकांचा हल्लाबोल, न्यायालयीन चौकशीच्या मागणीने सावंत सरकारवर दबाव

SCROLL FOR NEXT