Gomantk Bhandari Samaj: भंडारी समाज समितीचे आज ठरणार भवितव्य; ‘जैसे थे’ स्थिती असतानाही घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Bhandari Samaj Committee: जिल्हा संस्था निबंधकांनी निवडणूक प्रक्रिया ‘जैसे थे’ ठेवल्याने कागदोपत्री अस्तित्वात नसलेल्या गोमंतक भंडारी समाजाच्या समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
Gomantk Bhandari Samaj: भंडारी समाज समितीचे आज ठरणार भवितव्य; ‘जैसे थे’ स्थिती असतानाही घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Bhandari SamajDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जिल्हा संस्था निबंधकांनी निवडणूक प्रक्रिया ‘जैसे थे’ ठेवल्याने कागदोपत्री अस्तित्वात नसलेल्या गोमंतक भंडारी समाजाच्या समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. तथापि, समाजाची अशोक नाईक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच बेकायदेशीर आहे, असा दावा करणाऱ्या याचिकेवर आज दुपारी ३.३० वाजता जिल्हा संस्था निबंधकांसमोर सुनावणी होणार आहे. संस्थेच्या अशोक नाईक समितीने ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या आमसभेत समितीची मुदत वाढवून घेतली होती.

त्याला ॲड. आतीष मांद्रेकर आणि ॲड. अनिश बकाल यांनी आव्हान दिले आहे. त्यावर निकाल देताना अशोक नाईक यांची समिती बेकायदेशीर ठरवून संस्थेवर प्रशासक नेमण्याचा आदेश दिला होता. अशोक यांनी त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले असता त्यांना बजावण्यात आलेल्या नोटीशीतील त्रुटी दूर करून पुन्हा प्रक्रिया करा, असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानुसार जिल्हा संस्था निबंधकांनी पुन्हा नोटीसा बजावून सुनावणी सुरू केली आहे. त्यांनी निवडणूक प्रक्रिया ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश देत पुढील सुनावणी उद्या (ता.७ रोजी) ठेवली आहे.

Gomantk Bhandari Samaj: भंडारी समाज समितीचे आज ठरणार भवितव्य; ‘जैसे थे’ स्थिती असतानाही घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Bhandari Samaj: भंडारी समाजाची नवनिर्वाचित समिती बेकायदेशीर: अनिश बकाल

या निवडणुकीत विरोधी गटाच्या २१ पैकी २० जणांचे अर्ज फेटाळल्यानंतर १७ जणांची समिती बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. या समितीला जिल्हा संस्था निबंधकांनी अद्याप मान्यता दिलेली नाही.

Gomantk Bhandari Samaj: भंडारी समाज समितीचे आज ठरणार भवितव्य; ‘जैसे थे’ स्थिती असतानाही घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Bhandari Samaj Goa: अशोक नाईक गटाला दिलासा, संस्था महानिरीक्षकांचा निवाडा रद्दबातल; भंडारी समाजातील संघर्ष

निवेदन सादर

भंडारी समाजाची नवी समितीच अस्तित्वात नाही. तरीही आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केल्याने त्याविषयी समाज बांधवांत चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्‍यांत समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, निवडणुकीत विजयी झाल्याचा दावा करणारे देवानंद नाईक, किशोर नाईक, दिलीप नाईक, वासुदेव विर्डीकर, अवधूत नाईक, कृष्णकांत गोवेकर, विजय कानोळकर यांचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com