Rashi Bhavishya 7 November 2024: मेहनतीचं फळ मिळण्याचा आजचा दिवस, नातेवाईकांच्या भेटीचाही योग; जाणून घ्या काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य

Daily Horoscope 7 november 2024: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा हा दिवस आहे.
Rashi Bhavishya 7 November 2024: मेहनतीचं फळ मिळण्याचं आजचा दिवस, नातेवाईकांच्या भेटीचा योग; जाणून घ्या काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य
Rashi Bhavishya 7 November 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

आजचे राशीभविष्य

मेष: कामाच्या क्षेत्रात नक्कीच प्रगती कराल. व्यापारी वर्गाला आज बराच फायदा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या शब्दांवर आणि रागावर नियंत्रण ठेवा.

वृषभ: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा हा दिवस आहे. घरासाठी काही तरी खरेदी कराल. कोणा जुन्या व्यक्तीशी भेट होऊन अनेक गोष्टींवर चर्चा होईल.

मिथुन: तुमच्या विरोधकांपासून सावध राहा. वाहने चालवताना वेगावर नियंत्रण असुद्या. अनावश्यक खर्चावर नियंत्रण फारच गरजेचे आहे.

कर्क: आजच्या दिवशी उत्साहाने सर्व कामे कराल. बिझनेसमधून देखील भरपूर लाभ होईल. काहीतरी आकस्मित लाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह: सामाजिक क्षेत्रात नाव कमवाल. पोटाचं किंवा डोक्याचं दुखणं उद्भवू शकतं. तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

कन्या: आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. केलेल्या गुंतवणुकीमधून फायदा मिळण्याची शक्यता आहे. गाडी खरेदीच्या विचारात असाल तर ती इच्छा पूर्ण होईल.

तूळ: आज काहीसा थकवा जाणवू शकतो. वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा, त्यामधूनच फायदा होईल. कष्टदायी कामे शक्यतो हाती घेऊ नका.

वृश्चिक: करिअरच्या बाबतीत आजचा दिवस उत्तम आहे. घरातील काही वस्तूंवर खर्च करावा लागू शकतो.

धनु: सुख आणि समाधानी असा आजचा दिवस असेल. सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना मोठी डील मिळण्याची शक्यता आहे

मकर: मेहनत केल्यास आज नक्कीच लाभ मिळेल. बिझनेसमधून भरपूर लाभ कमवाल.

कुंभ: आज तुम्हाला काही तांत्रिक गोष्टींमुळे त्रास सहन करावा लागू शकतो. नवीन जमीन अथवा घर घेण्याच्या विचारात असाल तर नीट विचार करुन निर्णय घ्या. भावंडांकडून आज नक्कीच मदत मिळेल.

मीन: आज तुम्हाला जागरुक राहण्याची गरज आहे. दूरच प्रवास होण्याची शक्यता आहे, मात्र तो प्रवास सांभाळून करावा. खर्च देखील जपून करावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com