Goa Vasco Accident Hit And Run Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: वास्को येथे वेगवान नॅनो कारची दुचाकीला धडक; पिशे डोंगरीचा वृद्ध गंभीर जखमी

अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार

Akshay Nirmale

Goa Vasco Accident Hit And Run: वास्को येथील एमएमसी गार्डनजवळ शुक्रवारी नॅनो कार आणि दुचाकीमध्ये अपघात झाला. दुचाकीला धडक दिल्यानंतर नॅनो कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातात दुचाकी चालक वृद्ध जखमी झाला आहे.

जोआओ कोलाको (वय 79 वर्षे) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. ते पिशे डोंगरी येथील रहिवासी आहेत. नॅनो चालक हा डॉक्टर असल्याचे सांगितले जात आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार वेगाने आलेल्या नॅनो कारने दुचाकीवरील जोआओ कोलाको यांना धडक दिली. यात जोआओ जखमी झाले. तथापि, कारचालक त्यांना तशाच अवस्थेत रस्त्यावर सोडून पसार झाला. पोलिसांनी या कारचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.

त्यासाठी परीसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. स्थानिकांनी या घटनेतील दोषी कारचालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa October Heat: ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच 'हिट'; राज्यात एका दिवसात तापमान 3.4 अंशांनी वाढले, उकाड्याने नागरिक हैराण

DA Hike: दसऱ्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार? महागाई भत्त्यात 3 ते 4 टक्के वाढीची शक्यता; पगार किती वाढणार?

Flydubai CO Pilot Controversy: बाप ओमानी, आई सीरियन अन् अलकायदा समर्थक! कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर हल्ला करणारा सहवैमानिक नेमका कोण? धक्कादायक खुलासा

Ketu Gochar 2026: केतुची उलटी चाल! 4 राशींचे उजळणार भाग्य, करिअर-व्यवसायात होणार पैशांचा पाऊस; अवघ्या काही तासांत बदलणार आयुष्य

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT