Morjim Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: रशियन पर्यटकाच्या भरधाव दुचाकीची महिलेला जोरात धडक; मोरजीमध्ये अपघात

जखमी महिला रूग्णालयात दाखल

Akshay Nirmale

Goa Accident: गोव्यात रविवारी रशियन पर्यटकाच्या दुचाकीच्या धडकेत स्थानिक महिला जखमी झाली. उत्तर गोव्यातील मोरजी येथे हा अपघात झाला. प्रीती शेडगावकर असे जखमी महिलेचे नाव आहे. तिला उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.

मोरजी हा गोव्यातील सुप्रसिद्ध किनारी भाग आहे. येथे मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटकांची वर्दळ असते. विशेष म्हणजे, अपघात ग्रस्त रशियन पर्यटकाच्या गाडीवर पांढऱ्या रंगाची नंबरप्लेट आहे. त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

टी ०७ २३ एचपी ७०३१ एफ असा अपघातग्रस्त दुचाकीचा क्रमांक आहे. संबंधित रशियन पर्यटकाकडे वाहतूक परवाना नव्हता. भरधाव वेगाने आलेल्या रशियन पर्यटकनाने थेट महिलेला धडक दिली. रशियन पर्यटकाकडील गाडीही खासगी आहे.

येथे अनेकदा पर्यटक वेगाने गाड्या चालवत असतात. त्यांच्यावर कसलेही नियंत्रण नाही. वाहतूक पोलिसांना वारंवार सांगुनही येथे काही ठिकाणी साईन बोर्ड उभारलेले नाहीत.

अशा अपघातांना कुणाला कारणीभूत धरायचे, असा सवाल संतप्त स्थानिकांनी केला आहे. नो पार्किंग बोर्ड असूनही त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT