Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, ख्रिसमसला कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Nuvem Road Crossing Accident: दुचाकी चालक जोराने गाडी चालवत होता, त्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी म्हटले

Akshata Chhatre

नुवे: कार्मेल महाविद्यालयाजवळ असलेल्या आगना चॅपेलसमोर एका दुचकीन धडक दिल्याने पादचारी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. फातिमा इलारिओ असे या मयत महिलेचे नाव असून कुडतरी पोलिसांनी दुचाकीचालक संशयित आशिष पटेल याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुचाकी चालक वेगाने गाडी चालवत होता, त्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

२५ डिसेंबर म्हणजेच नाताळच्या दिवशी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आके मडगाव येथील रहिवासी आशिष पटेल हा त्याच्या दुचाकीसह भरधाव वेगाने मडगावच्या दिशेने येत होता आणि याचवेळी मयत फातिमा इलारिओ या रस्ता ओलांडत होत्या.

गाडीची जबर धडक बसल्याने वयस्क महिला गंभीर जखमी झाली व तिला उपचारांसाठी दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाच या वयस्क महिलेचा मृत्यू झाला. डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने तसेच, मणक्याला इजा झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.

मायना कुडतरी पोलिसानी पंचनामा केल्यानंतर संशयित आरोपी आशिष पटेल याच्यानावे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास मायना कुडतरी पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सोनल गावकर करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

Goa Live News: साळ येथील श्री महादेव भूमिका फंडपेटी वादप्रकरणी चौकशी लांबणीवर

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

SCROLL FOR NEXT