One person was injured when a mango tree fell on a running jeep Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: धावत्या जीपगाडीवर कोसळले आंब्यांचे झाड; एकजण जखमी

गावठणमधील घटना; तासभर वाहतूक ठप्प

दैनिक गोमन्तक

Goa Accident News: साखळी येथे धावत्या जीपगाडीवर आंब्यांचे झाड कोसळून एकजण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. तर जीपगाडीच्या चालकासह दोघेजण सुखरूप बचावले. ही घटना आज (गुरुवारी) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास साखळी-आमोणे रस्त्यावरील गावठण येथे घडली.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी असलेले बोर्डे येथील केशू पळ हे या अपघातात जखमी झाले. डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड बाजूला केल्यानंतर सुमारे तासाभराने या रस्त्यावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत झाली.

यासंबंधीची माहिती अशी की, जीए-04-टी-6389 या क्रमांकाची जीपगाडी बिल रिडींगसाठी कर्मचाऱ्यांना घेवून न्हावेली येथे जात होती. गावठण येथे जीपगाडी पोचताच रस्त्याच्या बाजूने असलेला एक भलेमोठे आंब्यांचे झाड जीपगाडीवर कोसळले.

या घटनेत जीपगाडीची मोडतोड होवून चालकासह तिघेजण आत अडकून पडले. पैकी केशू पळ याच्या डोक्याला जखम झाली. लागलीच 108 रुग्णवाहिकेला पाचारण करुन जखमी पळ याला उपचारार्थ साखळीच्या सामाजिक इस्पितळात नेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

Goa Drug Bust: कोलवाळ जेलजवळ गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 'इतक्या' लाखांच्या गांजासह राजस्थानच्या 19 वर्षीय तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT