Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accidental Death: खड्डे चुकविण्याच्या नादात 32 वर्षीय तरुणाचा हकनाक बळी

कुडचडे येथे तरुण ठार : दोन दुचाकींमध्ये अपघात; स्थानिकांनी व्यक्त केला तीव्र संताप

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accidental Death कुडचडे येथे शनिवारी रात्री झालेल्या अपघातात कट्टा-आमोणा येथील मनोज सुतार (32) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कुडचडे येथील रस्त्यांवरील खड्डे चुकविताना ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 12 वाजता कुडचडे रवींद्र भवनसमोर दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात कट्टा-आमोणा येथील मनोज सुतार या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या दुचाकीस्वारासह आणखी एकजण गंभीर जखमी झाला.

घटनेला सरकार जबाबदार!

शनिवारी जो अपघात झाला, त्याला रस्त्यावरील खड्डे जबाबदार असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. कुडचडेतील रवींद्र भवनसमोरून सांगेकडे जाणाऱ्या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले असून हे खड्डे मोठमोठे दगड घालून बुजविले असले तरी रस्ता ओबडधोबड आहे. हे खड्डे चुकविण्याच्या नादात केपेकडे जाताना समोरून येणाऱ्या दुचाकीची टक्कर झाल्याने मनोजचा जागीच मृत्यू झाला.

किती बळी घेणार? : रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे सोडून रस्ते खोदण्याचे काम सुरूच असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. कंत्राटदाराला या रस्त्यांचे काहीच पडलेले नाही. कुडचडेत जीवाशी खेळ सुरू असल्याची तक्रार लोकांनी केली.

जखमीचा मृत्यू; चालकावर गुन्हा

म्हापसा : शिरसई येथील पेट्रोल पंपाजवळ सहा दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातील जखमी संज्योत मांद्रेकर (वय २३, रा. शिरगाव) याचा उपचारादरम्यान गोमेकॉत मृत्यू झाला. कोलवाळ पोलिसांनी या अपघातास कारणीभूत ठरलेला कारचालक रॉयस्टन फोन्सेका (रा. माडेल-थिवी) याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT