गोवा: आम आदमी पक्षाचे गोव्याचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अमित पालेकर यांनी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. आजचा दिवस हा गोमंतकीयांचा भविष्य ठरवणारा दिवस असून, हा बदल घडवून आणण्याचा क्षण असल्याचे पालेकर यांनी सांगितले. दरम्यान, बदल घडवून आणण्याचा आत्मविश्वास बाळगून पालेकर (Goa AAP CM Candidate Amit Palekar) म्हणाले, "भ्रष्टाचाराला पराभूत करण्यासाठी नागरिक उत्साहाने मतदान करत आहेत, आणि त्या परिवर्तनाचे आपण साक्षीदार होऊ असे ते म्हणाले." दरम्यान त्यांच्यासोबत त्यांची आईदेखील होती. (Goa AAP CM Candidate Amit Palekar Statment on goa Assembly election 2022)
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejariwal) यांनी ट्वीटरद्वारे गोव्यातील जनतेला संबोधित केले. तसेच जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "प्रिय गोवेकरांनो, ही भ्रष्ट व्यवस्था बदलून गोवा भ्रष्टाचारमुक्त करण्याची ताकद तुमच्यात आहे. कृपया आज बाहेर पडा आणि तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी मतदान करा." असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.
आज गोव्यात विधानसभेचे (Goa Assembly Election) मतदान पार पडले असून, आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरवात झाली आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गोव्यातील 40 मतदारसंघांतील 1722 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असून, संध्याकाळी 5 ते 6 हा कालावधी कोरोना रुग्णांसाठी (Corona Patients) असणार आहे. गेल्यावर्षी राज्यात एकूण 1663 मतदान केंद्र होती; तर यावर्षी एकूण 1722 मतदान केंद्रे (Voting Booth) आहेत. गोव्यातील सर्वाधिक म्हणजे 59 मतदान केंद्रे काणकोण या मतदारसंघात आहेत; तर तुलनेत सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी 30 केंद्रे पणजी, मुरगाव आणि दाबोळी या मतदारसंघात आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.