AAP National Convenor Arvind Kejariwal and AAP Goa Leader Babu Nanoskar at Dabolim Airport  Dainik Gomantak
गोवा

'केजरीवालांच्या कुशल नेतृत्वाखाली आम आदमी पक्ष अवश्य भरारी मारेल'

अरविंद केजरीवाल यांचे गोव्यात आगमन होताच आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यातर्फे त्यांचे जल्लोषात स्वागत

Dainik Gomantak

Goa: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejariwal) यांचे गोव्यात आगमन होताच आम आदमी पक्षाच्या (AAP) कार्यकर्त्यातर्फे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दीपावलीच्या शुभमुहूर्तावर केजरीवाल यांचे गोव्यात येणे म्हणजे एकाप्रकारे विजयोत्सव असल्यासारखे आहे. त्यांचे कुशल नेतृत्वाखाली पक्ष अवश्य भरारी मारेल असे प्रतिपादन दाबोळीचे आम आदमी पक्षाचे नेते प्रेमानंद (बाबू) नानोस्ककर (AAP Leader Babu Nanoskar) यांनी केले.

आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सोमवार दि. 1 रोजी दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन होताच गोव्यातील आम आदमी पक्षाचे नेते राहुल म्हांबरे, वाल्मिकी नाईक, प्रतिमा कुतिन्हो, महादेव नाईक, प्रेमानंद नानोस्कर, पांडुरंग कोल्हापुरे व इतर कार्यकर्त्याने स्वागत केले.

यावेळी दाबोळीचे आम आदमी पक्षाचे नेते प्रेमानंद नानोस्कर म्हणाले की गोव्यात आपचे कार्य गावोगावी पोचले असून मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली येथे यश प्राप्त होणार यात शंकाच नाही. येथील आपचे नेते राहुल म्हांबरे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे युटर्न घेणारे असून त्यांची आश्वासने फक्त कागदावरच तेवढी राहिली आहे. विकासाच्या नावाने सरकारने सामान्य जनतेला आर्थिकरित्या कुमकुवत करून ठेवले आहे. दीपावलीच्या दिनी केजरीवाल यांचे आगमन म्हणजे यंदा गोवावासियांना शुभ असल्याचे म्हांबरे यांनी सांगितले.

राज्य सरकारने सामान्य जनतेला महागाईत टाकलेले आहे. यामुळे असल्या सरकारवर विश्वास ठेवणे जनतेने बंद करावे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात आप यशस्वी होणार असल्याची माहिती प्रतिमा कुतिन्हो यांनी दिली. दिल्ली ते गोवा 'आप' योजने बरोबर विकास साधण्यासाठी आला आहे. गोव्यात महामारी वेळी खाण, पर्यटन, व्यवसायातील आर्थिक नुकसान झालेल्यांना आप आर्थिक सहकार्य करणार आहे, जे राज्य सरकार करू शकले नाही ते केजरीवाल अवश्य पूर्ण करणार असल्याची माहिती महादेव नाईक यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT