कुडचिरेत घरावर झाड कोसळले दैनिक गोमन्तक
गोवा

जोरदार पर्जन्यवृष्टीचा पुन्हा तडाखा

कुडचिरेत घरावर झाड कोसळले

Dainik Gomantak

Goa: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज ऐन दसऱ्यादिवशी (Dussehara) परतीच्या पावसाने जोरदार तडाखा (Rain Hit) दिला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार पावसामुळे कुडचिरे (Curchorem) येथे घरावर झाड कोसळले (Tree Collapsed on House). विजाचा लखलखाट आणि ढगांच्या प्रचंड गडगडाटासह शुक्रवारी सायंकाळी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. काळोख करून पडलेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र नागरिकांची तारांबळ उडाली. एक तासाहून अधिक वेळ पावसाची बरसात चालू होती.

घरावर झाड कोसळले

तडाख्याच्या पावसात कुडचिरे येथील रामा वरक यांच्या घरावर झाड कोसळण्याची घटना घडली. या घटनेत घराची मोडतोड वगळता अन्य विपरीत घटना घडली नसल्याची माहिती मिळाली आहे. डिचोली अग्निशमन दलाला माहिती मिळताच उपअधिकारी मुकुंद गवंडी यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

भातशेती धोक्यात

गेल्या मंगळवारनंतर पावसाने पुन्हा तडाखा दिल्याने डिचोलीतील बहूतेक भागात भातशेती आडवी झाली आहे. एकाबाजूने भात कापणीच्या प्रतीक्षेत असतानाच अधूनमधून पावसाचा कहर चालू असल्याने बळीराजा गळीतगात्र बनला आहे. एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाचा कहर पाहता, यंदा हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यातच जमा आहे. असा निराशाजनक सूर शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT