होंडा गावकरवाडा येथे अपघातात सापडलेला टेम्पो असा आडवा झाला आहे. (Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: दुधवाहू टेम्पोला होंडा येथे अपघात

जिवित हानी नाही, दुध व गाडीचे नुकसान

Dainik Gomantak

पिसुर्ले: होंडा गावकरवाडा (Honda Gaonkarwada) येथे आज सायंकाळी एका दुधवाहू टेम्पो (Milk carrier) चालकांनी रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांना वाचण्यासाठी लावलेल्या ब्रेक मुळे अपघातास सामोरे जावे लागले, यात कोणतीच जिवित हानी झाली नाही, मात्र या अपघातामुळे वाहनाचे तसेच दुधाचे नुकसान (Loss of milk) झाले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की आज सायंकाळच्या दरम्यान केरी सत्तरी भागातील दुध गोळा करून होंडा गावकरवाडा मार्गे सदर टेम्पो फोंडा येथील दुध डेअरी मध्ये जात होता, या वेळी होंडा गावकरवाडा येथे पोचताच रस्त्यावर भटकणारे कुत्रे आडवे आल्याने, सदर कुत्र्याला वाचविण्यासाठी अचानक ब्रेकचा वापर करावा लागल्याने सदर टेम्पो रस्त्याच्या बाजूला कलंडला, मात्र सुदैवाने यावेळी चालकाला कोणतीच दुखापत झाली नसल्याचे समजते. या अपघातामुळे वाहनाचे तसेच दुधाचे नुकसान झाले असून, या संबंधी होंडा पोलिस ठाण्यात अपघाताची कोणतीच नोंद झाली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

दरम्यान या अपघातावरून या भागात प्रचंड प्रमाणात वाढलेला भटक्या कुत्र्यांचा तसेच गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अशा प्रकारे बऱ्याच वेळा भटकी कुत्री व गुरे यामुळे वाहन चालकांना अपघातास सामोरे जावे लागत आहे, या प्रकरणी संबंधित यंत्रणेने तातडीने लक्ष घालून त्यांना आवर घालावी अशी मागणी होंडा परीसरातील नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT