Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून; एकाचवेळी 5 महाविद्यालयांना देता येणार पसंती, येथे आहे अर्जाची लिंक

Goa First Year Online Admission Process: उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या शासकीय आणि अनुदानित अशा ४० महाविद्यालयांत प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शुक्रवार, ११ एप्रिलपासून सकाळी ११ वाजता सुरू होणार

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या शासकीय आणि अनुदानित अशा ४० महाविद्यालयांत प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शुक्रवार, ११ एप्रिलपासून सकाळी ११ वाजता सुरू होणार असल्याची माहिती उच्च शिक्षण संचालनालयातील नोडल अधिकारी डॉ. महादेव गावस यांनी दिली.

यामध्ये बीए, बी.कॉम, बी.एससी, संगीत, थिएटर, गृहविज्ञान, व्होकेशनल, बीसीए, बीबीए, बीपी.एड, बीए.एलएलबी, बी.एससी कृषी, एएनडब्लू आणि जीएनएम, बी.एससी इन स्पोर्टस सायन्स, बी.एससी डाटा सायन्स या शाखांचा समावेश असून या शाखांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात.

२५-२०२६ या शैक्षणिक वर्षाची सर्व शाखांची प्रवेश प्रक्रिया ‘ई समर्थ गव्हर्नन्स’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून होणार आहे. प्रथम वर्षासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी https://dhe.goa.gov.in/ या संकेतस्थळावरील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावेत, असे आवाहनही डॉ. गावस यांनी केले.

ज्या महाविद्यालयांमध्ये बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रम सुरू झालेला आहे, ती महाविद्यालये विद्यार्थ्यांची ऑफलाईन प्रवेश परीक्षा घेतील. बीए.एलएलबीसाठीची प्रवेश परीक्षा गोवा विद्यापीठ घेईल, असेही डॉ. महादेव गावस यांनी सांगितले.

‘ई-समर्थ पोर्टल’वर नोंदणी

१ ऑनलाईन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाचवेळी पाच महाविद्यालयांना पसंती देता येईल. शिवाय एकाचवेळी पाच शाखांसाठी अर्ज करता येईल. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने ‘ई-समर्थ पोर्टल’वर एकदाच नोंदणी करावी.

प्रत्येक महाविद्यालय स्वतंत्रपणे गुणवत्ता यादी तयार करणार असून विद्यार्थ्यांनी जागा निश्चित झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयात प्रवेश शुल्क भरावे. ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना कोणतीही समस्या आल्यास संबंधित महाविद्यालय आणि उच्च शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयास भेट द्यावी.

३० एप्रिलपर्यंत प्रवेश प्रक्रिया

विद्यार्थी ऑनलाईन अर्ज ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजल्यापासून करू शकतात. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२५ आहे. ऑनलाईन अर्ज मोफत असून त्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. याशिवाय ई-माहिती पुस्तिका संबंधित महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT