MLA Dayanand Sopte and Honorable at Dandoswada  Dainik Gomantak
गोवा

370 कोटी खर्च करून प्रकल्पाची कामे सुरु: आमदार सोपटे

मांद्रे मतदार संघातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार सोपटे यांचे आश्वासन

Dainik Gomantak

Goa: गोवा पर्यटन विकास महामंडळ (Goa Tourism Development Corporation) मार्फत राज्यभर एकूण 370 कोटी पेक्षा जास्त निधीची कामे पूर्ण झाली तर काही प्रकल्प चालू आहेत, हा निधी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (CM Dr Sawant) आणि केंद्र सरकारकडून वेळेवर मिळत असल्याने उर्वरित अनेक सुशोभीकरणाची कामे वेळेवर केली जाणार, अशी ग्वाही दान्डोसवाडा ब्राह्मण परिसराचे गोवा पर्यटन विकास महामंडळ मार्फत सुशोभीकरण केलेल्या काम लोकार्पण केल्यानंतर दिली.

यावेळी माजी सरपंच संतोष बर्डे, हरमल माजी सरपंच अनंत गडेकर, तुयेच्या माजी सरपंच प्राजक्ता कान्नायिक, माजी उपसरपंच डेनिस ब्रिटो, अनिल आसोलकर विष्णू सावंत, मांद्रे भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब, गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंत आदी उपस्थित होते.

आमदार दयानंद सोपटे यांनी यावेळी मांद्रे मतदार संघातील प्रमुख समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून राज्याबरोबरच मतदार संघात पर्यटन विकास महामंडळा मार्फत विकासात्मक प्रकल्प राबवताना बेरोजगारीचा प्रश्नही सोडवण्याचे प्रयत्न असतील.

समुद्र किनाऱ्या पलीकडील पर्यटनाला वाव देण्यासाठी स्वदेश दर्शन योजनेंतर्गत एकूण चाळीशी मतदार संघात प्रकल्प राबवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे . मान्द्रे किनारी भागात पोलीस चौकी , वीज उपकेंद्र , रवींद्र कला भवन , किनारी सौचालायाची सोय , भूमिगत वीज वाहिन्या , तेरेखोल केरी अर्धवट असलेल्या पुलाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले .

मतदार संघाबरोबरच राज्यात राबवलेले प्रकल्प

गोवा पर्यटन विकास महामंडळ मार्फत मांद्रे मतदार संघात आणि राज्यात प्रकल्प उभारले त्याची माहिती देताना शांता मोनिका जेटी परिसराचे सुशोभीकरणावर ५ कोटी 3 लाख रुपये , हनजुणा सुशोभीकरण तसेच बोडगेश्वर मंदिर रस्ता ते संकलेश्वर वेर्ला काणका सात कोटी 63 लाख रुपये खर्च. दक्षिण गोव्यातील किनारी भागात शौचालय सुशोभीकरण करण्यावर 4 कोटी 82 लाख व उत्तर गोव्यात 4 कोटी 82 लाख रुपये.

हायमाक्स भूमिगत केबल व विद्युत रोषणाई तीरामल सर्कल 3 कोटी 37 लाख, काणकोण येथील मल्लिकार्जुन मंदिर परिसराचे सुशोभीकरण 3 कोटी 25 लाख, सालीगाव चर्च परिसर विकास व सुशोभीकरण 2 कोटी 60 लाख रुपये. अवर लेडी रेमेडीयस चर्च नेरुल परीसारचे सुशोभीकरण 1 कोटी 61 लाख , काकोडा येथील महादेव मंदिर सुशोभीकरण 56 लाख , सावईवेरे आर सीपीआर एजुकेषन टोयलेट ब्लोक 24 लाख रुपये.

पर्यटन भवन सुविधा 2 कोटी 22 लाख , हिन्तरलेंड कुडचडे बसस्थानक जवळ 6 कोटी 64 लाख . मंगेशी म्युजियम 2 कोटी 17 लाख , कलंगुट बागा रस्ता सुशोभीकरण 59 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे काही प्रकल्पांचे टेंडर झाले आहे कामाची ऑर्डर मिळाली नाही , जवळ जवळ 228 कोटी रुपये खर्च करून कामे चालू असल्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी सांगितले

यावेळी अनिल आसोलकर यांनी आमदार दयानंद सोपटे यांनी विकासाला प्राधान्य दिल्याचे सांगून नागरिक त्यांना पुन्हा एकदा संधी देतील असा विश्वास व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT