Goa School Dainik Gomantak
गोवा

Goa: गणेश चतुर्थीनंतर वाजणार शाळेची घंटा!

शाळा सुरू करेपर्यंत गोव्यातील 75 टक्के लोकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असतील.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यांतील (Goa) शाळा (School) गणेश चतुर्थीनंतर (Ganesh Chaturthi) सुरू करता येऊ शकतील, असा मतप्रवाह आता तयार होऊ लागला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारही कोविड रुग्ण व लसीकरणाच्या आकडेवारीचा हवाला देत हे शक्य होईल, असे सांगू लागले आहेत.

कोविडच्या पहिल्या लाटेत 54 हजार 986 रुग्ण सापडले होते, 795 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळचा मृत्यू दर हा 1.44 टक्के होता. दुसऱ्या लाटेत 1 लाख 16 हजार 160 रुग्ण सापडले त्यापैकी 2 हजार 352 जण मरण पावले. मृत्युदर त्यामुळे 2.02 झाला. त्यामुळे एकूण 1 लाख 71 हजार 146 रुग्णांपैकी 3 हजार 147 मरण पावले. हा मृत्युदर 1.83 टक्के होतो. हा आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त दराइतकाच आहे. याविषयी डॉ. शेखर साळकर यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार गणेश चतुर्थीनंतर 15 दिवसांनी शाळा सुरू करता येईल तोवर तिसरी लाट येते की नाही हेही समजून येणार आहे.

शाळा सुरू करेपर्यंत राज्यातील 75 टक्के लोकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असतील. जेथे ऑनलाईन शिक्षण देणे शक्य आहे तिथे ऑनलाईन आणि जिथे शक्य नाही तिथे प्रत्यक्षातील वर्ग अशा शाळा पहिल्या टप्प्यात सुरू करता येतील.

मी काल सोलापूर येथे गेलो असता ग्रामीण भागातील शाळा सुरू दिसल्या. येताना कर्नाटकमार्गे आलो तेव्हाही ग्रामीण भागातील शाळा सुरू दिसल्या. कोविडचे रुग्ण नसलेल्या गावांतील शाळा तेथे सुरू केल्या असाव्यात. दिवाडी बेटावर सामाजिक शाळा सुरू करण्यात आली आहे.

- म्हाळसाकांत देशपांडे, मुख्याध्यापक, एल.डी. सामंत मेमोरियल हायस्कूल, पर्वरी

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अहवालानुसार सरकार निर्णय घेईल. शाळा गणेश चतुर्थीनंतर सुरू होऊ शकतील. त्यातही आठवी ते दहावीच्या वर्गांना प्राधान्य देता येईल. इतर राज्यांनी कोणते निर्णय घेतले त्यांचा अनुभव काय हे जाणून घेऊन शिक्षण खाते सरकारला शिफारस करील.

डी. आर. भगत, शिक्षण संचालक

कोविडच्या तिसऱ्या लाटेची चर्चा असल्याने सरकारला सावधानतेनेच निर्णय घ्यावा लागणार आहे. आम्ही शिक्षक सरकारला जरूर ते सहकार्य करणार आहोत. पालकांसोबत आम्हालाही विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता आहे.

- माधव खारवी, अध्यक्ष मुख्याध्यापक संघटना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: डिस्को लाईट्स अन् 'विरुष्का'चा नादखुळा डान्स! आरसीबीच्या बॅक-टू-बॅक विजयाचं तगडं सेलिब्रेशन; रोमँटिक व्हिडिओ व्हायरल

Goa Pink Taxi: पिंक रिक्षानंतर आता महिलांसाठी 'पिंक टॅक्‍सी'; सहकार खाते प्रयत्‍नशील, बँकांशी सकारात्मक चर्चा

Goa Road Accident: 'थार'की मृत्युचा सापळा? आठवड्यात तिघांचा बळी, पाच महिन्यांत 101 रस्ते अपघाती मृत्यू

अय्‍यांनी खडक फोडून आणले पाणी; देशभरात गाजली जिद्दीची कहाणी! 'मन की बात'मध्‍ये पंतप्रधान मोदी यांच्याकडून कौतुक

इराणचा कुवेतवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा भीषण मारा; प्रत्युत्तरात अमेरिकेचे 'सेल्फ-डिफेन्स' हल्ले तर इस्रायलकडून हिजबुल्लाहवर बॉम्बवर्षाव

SCROLL FOR NEXT