10th Exam Results Dainik Gomantak
गोवा

Goa 10th Result: विक्रमी वेळेत 10 वीचा निकाल देणारे गोवा ठरले देशातील पहिले राज्य, 173 शाळांचा निकाल 100%

Goa 10th Exam Results: दहावीच्या शालान्त परीक्षेचा निकाल गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला.

Sameer Panditrao

पणजी: दहावीच्या शालान्त परीक्षेचा निकाल गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज जाहीर केला. एकूण दहावीचा निकाल ९५.३५ टक्के लागला. राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित तसेच सरकारी शाळा मिळून ४०७ शाळांपैकी १७३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

परीक्षेनंतर अवघ्या पंधरा दिवसांत निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून अशाप्रकारे विक्रमी वेळेत निकाल देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. गेल्या वर्षी १५ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता.

दहावीच्या परीक्षेत नेहमीप्रमाणे यंदाही मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक आहे. या परीक्षेत ९,२८० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ८८१४ उत्तीर्ण झाले, विद्यार्थ्यांचा निकाल ९४.९८ टक्‍के लागला, तर ९,५५८ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती. पैकी ९१४७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. विद्यार्थिनींचा निकाल ९५ टक्के लागला. दहावीची परीक्षा राज्यभरातील ३२ केंद्रांवर १ ते २१ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेतील दिव्यांग विद्यार्थ्यांची कामगिरीही उल्लेखनीय आहे.

पुढील वर्षी दहावीला दहा विषय

यंदा जुन्या अभ्यासक्रमानुसार दहावीची शेवटची परीक्षा झाली. पुढील वर्षी एनईपीनुसार परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे दहावीतील विद्यार्थ्यांना आता एकूण दहा विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे. ज्यामध्ये तीन भाषा विषय, गणित, समाज विज्ञान आणि विज्ञान हे मुख्य विषय तसेच चार कौशल्य आधारित विषय असतील. या चार कौशल्य आधारित विषयांपैकी दोन विषयात ६५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाल्यास मुख्य विषयातील दोन विषयात जरी कमी गुण मिळाले तरी विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होतील, अशी माहिती गोवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.

१० एप्रिलपासून विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रत उपलब्ध होईल. तसेच उत्तरपत्रिका पुन्हा तपासायच्या प्रक्रियेला ११ एप्रिलपासून सुरवात होईल.

दहावीची पुरवणी परीक्षा ५ मेपासून सुरू होईल, तर २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील दहावीची अंतिम परीक्षा २ मार्चपासून सुरू होईल.

टक्केवारीनुसार उत्तीर्ण विद्यार्थ्यांची वर्गवारी

टक्केवारी उत्तीर्ण उमेदवार

४६ ते ५९ टक्के ५४२५

६० ते ७४ टक्के ८९२१

७५ ते १०० टक्के २३८५

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT