Goa Medical College Dainik Gomantak
गोवा

GMC Goa: 10 दिवसानंतही गोमेकॉत सर्व्हर समस्या कायम, नोंदणी यंत्रणा विस्कळित; रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप

GMC server issue: गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (गोमेकॉ) दहा दिवसांपूर्वी सर्व्हर बंद पडल्याने ओपीडी नोंदणी यंत्रणा विस्कळित झाली होती.

Sameer Panditrao

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (गोमेकॉ) दहा दिवसांपूर्वी सर्व्हर बंद पडल्याने ओपीडी नोंदणी यंत्रणा विस्कळित झाली होती. ही समस्या अजूनही कायम असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना ताटकळत रांगेत उभे राहण्याची वेळ येत आहे. ऑनलाइन प्रणाली ठप्प झाल्याने रुग्णालय प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली मॅन्युअल नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरूच आहे.

दररोज सुमारे १,५०० रुग्ण गोमेकॉच्या ओपीडीसाठी येत असतात. १७ जानेवारी रोजी सकाळपासूनच सर्व्हर बंद पडल्यामुळे रुग्णालय प्रशासनाला ऑफलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करावी लागली आहे. मात्र, दहा दिवस उलटूनही सर्व्हर समस्या सुटलेली नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये संताप

रुग्णालयातील नोंदणी काउंटरवर रांगा अजूनही पाहायला मिळत असून रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या स्थितीवर नाराजी व्यक्त करत आहेत. ताटकळत उभे राहणे कठीण होत आहे, विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांना खूपच त्रास होत आहेत, असे एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले.

ऑफलाइन नोंदणी प्रक्रियेमुळे ओपीडी सेवा मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली असून अनेक रुग्ण वेळेवर डॉक्टरांकडे पोहोचू शकत नाहीत. तसेच बराच वेळ रांगेत उभे रहावे लागते. त्यामुळे गोमेकॉच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

निदानाची गरज

सर्व्हर समस्या लवकरात लवकर सोडवून ऑनलाइन प्रक्रिया पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. यामुळे रुग्णांना मिळणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा होईल आणि नातेवाइकांना होणारा त्रास कमी होईल.

गोमेकॉत लवकरच नवी प्रणाली

या समस्येबाबत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, सर्व्हर बंद पडणे हे कर्मचाऱ्यांच्या चुकांमुळे झालेले नाही. गोमेकॉमध्ये असा प्रकार यापूर्वी कधीही घडलेला नव्हता, असे सांगून त्यांनी कर्मचाऱ्यांचा बचाव केला. तसेच, गोमेकॉ लवकरच आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली लागू करणार आहे, ज्यामुळे रुग्ण व्यवस्थापन अधिक चांगले होईल, असे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT