Tuyem Hospital Dainik Gomantak
गोवा

Tuyem: स्थानिकांना रोजगार द्या, 26 जानेवारीपूर्वी इस्‍पितळ सुरू करा, अन्यथा आंदोलन! तुये ग्रामस्थांचा इशारा

Tuyem Hospital: तुये येथे इस्‍पितळ २६ जानेवारीपूर्वी सुरू करावे. तसेच ८० टक्‍के रोजगार संधी तालुक्‍यातील मनुष्‍यबळाला मिळाव्‍यात; अन्‍यथा तीव् आंदोलन छेडण्‍यात येईल, असा इशारा दिला.

Sameer Panditrao

मोरजी: तुये येथे गोमेकॉ संलग्‍न सॅटेलाईट इस्‍पितळ येत्‍या २६ जानेवारीपूर्वी सुरू करावे. तसेच तेथे निर्माण होणाऱ्या ८० टक्‍के रोजगार संधी तालुक्‍यातील कुशल मनुष्‍यबळाला मिळाव्‍यात; अन्‍यथा तीव्र आंदोलन छेडण्‍यात येईल, असा इशारा तुये इस्‍पितळ कृती समितीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत दिला.

सभेला पार्सेचे माजी सरपंच तथा काँग्रेसचे नेते देवेंद्र प्रभुदेसाई, मांद्रेचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच ॲडव्‍होकेट अमित सावंत, माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कलंगुटकर, माजी सरपंच तथा विद्यमान पंच बाळा उर्फ प्रशांत नाईक, तुये हॉस्पिटल कृती समितीचे तुळशीदास राऊत, संजय राऊत, जोज लोबो, ॲडव्‍होकेट प्रसाद शहापूरकर, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांच्‍यासह अनेक ग्रामस्‍थ उपस्‍थित होते.

संबंधित इस्‍पितळाची घोषणा झाली; परंतु त्‍या संदर्भात नवे प्रवाद समोर येत राहिले. नागरिकांचे हीत समोर ठेवून येत्‍या अधिवेशनात मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी इस्‍पिळासंदर्भात स्‍पष्‍टता द्यावी, अशी मागणी यावेळी करण्‍यात आली.

पार्सेकर यांच्‍या कार्यकाळात तुयेत गोमेकॉ संलग्‍न सॅटेलाईट इस्‍पितळ सुरू करण्‍याची घोषणा झाली होती. परंतु त्‍याला बऱ्याच विलंबाने मूर्त रूप दिले जात असताना लोकांची दिशाभूल केली जात असल्‍याची स्‍थानिकांची भावना बनली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT