International Purple Festival 2025 Dainik Gomantak
गोवा

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

International Purple Fest of Goa 2025: 'आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल ऑफ गोवा 2025' हा एक जागतिक स्तरावरील उत्सव 9 ते 12 ऑक्टोबर 2025 या कालावधीत पणजी येथे रंगणार आहे.

Manish Jadhav

पणजी: विविधता आणि दिव्यांग व्यक्तींच्या (PwDs) प्रतिभेचा जगभर गौरव करणारा 'आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल ऑफ गोवा 2025' हा एक जागतिक स्तरावरील उत्सव 9 ते 12 ऑक्टोबर 2025 या कालावधीत पणजी येथे रंगणार आहे. “युनिव्हर्सल डिझाइन आणि सर्वसमावेशक विचार कृतीत” (Universal Design and Inclusive Thinking in Action) या थीमवर आधारित हा महोत्सव दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी एक मोठी चळवळ म्हणून ओळखला जातो. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या महोत्सवातील प्रमुख आकर्षणे

यंदाच्या पर्पल फेस्टिव्हलमध्ये सर्वसमावेशकता आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.

  1. युनिव्हर्सल डिझाइनवर भर: यावर्षी 'थिंक इनक्लुझिव्ह' (Think Inclusive) या संकल्पनेवर विशेष लक्ष दिले जात आहे. युनिव्हर्सल डिझाइन पॅव्हेलियनमध्ये पायाभूत सुविधा, वाहतूक आणि शिक्षणामध्ये सर्वसमावेशक डिझाइनचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल. 'डिझाइन फॉर ऑल चॅलेंज' मध्ये सार्वजनिक जागांसाठी प्रभावी, सोप्या कल्पना सादर करण्याची संधी नवोदितांना मिळेल.

ग्रामीण सर्वसमावेशकता परिषद: ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्या, शिक्षण आणि वाहतूक प्रवेशाच्या समस्यांवर तळागाळातील स्तरावर उपाययोजना शोधण्यासाठी हे विशेष व्यासपीठ असेल.

पर्पल एक्स्पीरिअन्स झोन: या झोनमध्ये दिव्यांग नसलेल्या लोकांना सहानुभूती (Empathy) वाढवण्यासाठी दिव्यांग व्यक्तींच्या जीवनातील आव्हाने प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी दिली जाईल.

कला आणि मनोरंजन (Purple Arts): 'पर्पल कॅलिडोस्कोप' (ललित कला) आणि 'पर्पल रेन' (संगीत, नृत्य आणि कॉमेडी शो) द्वारे दिव्यांग व्यक्तींच्या कलात्मक आणि सांस्कृतिक प्रतिभेचे प्रदर्शन केले जाईल.

साहसी क्रीडा (Purple Sports): या महोत्सवात पॅरासेलिंग, जेट स्कीईंग आणि स्कुबा डायव्हिंग सारख्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा समावेश आहे. याशिवाय ब्लाइंड फुटबॉल आणि पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धाही आयोजित केल्या जातील.

सहभागासाठी नोंदणी अनिवार्य

हा महोत्सव सर्वसमावेशक समाज निर्मितीसाठी एक मोठी चळवळ असल्याने, यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. या जागतिक उपक्रमात सामील होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे:

  • ऑनलाईन नोंदणी: सहभागी त्यांच्या सोयीनुसार अधिकृत पोर्टलद्वारे ऑनलाईन नोंदणी करु शकतात.

  • मोबाइल ॲप: या महोत्सवासाठी खास मोबाइल ॲप तयार करण्यात आले आहे. Google Play Store किंवा Apple App Store वर “IPFG” शोधून तुम्ही ॲप डाउनलोड करु शकता आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

मुलाचा घटस्फोट, आईने घातला दुधाने अभिषेक; 'हॅप्पी डिव्होर्स' केक कपणाऱ्या तरुणाचा Video Viral

SCROLL FOR NEXT