अमरनाथ पणजीकर  Dainik Gomantak
गोवा

'ग्लेन टिकलो यांनी हळदोणेत हस्तक्षेप करणे थांबवावे'

रवींद्र भवनवरून काँग्रेसच्या अमरनाथ पणजीकर यांची टीका

दैनिक गोमन्तक

पणजी: म्हापसा येथील नियोजित रवींद्र भवनच्या उभारणीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. हळदोणे मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार काम करण्यास समर्थ आहेत. भाजपचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी त्यांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नये, अशी टीका काँग्रेसचे प्रसार माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी ट्विटरवरून केली आहे.

भाजपचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी म्हापसा येथे रवींद्र भवन उभे राहत नसेल तर ते हळदोणे मतदारसंघात उभारावे यासाठी मी प्रयत्न करणार. यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न करू, असे विधान केले होते. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते श्री. पणजीकर यांनी श्री. टिकलो यांच्यावर ट्विट करून निशाणा साधला.

तुम्ही हळदोणे मतदारसंघाचे दोनवेळा प्रतिनिधित्व केले. या काळात राज्यात तुमची म्हणजेच भाजपची सत्ता होती. मग त्या काळात तुम्ही रवींद्र भवन उभारणीसाठी का प्रयत्न केले नाहीत, असा सवालही श्री. पणजीकर यांनी श्री. टिकलो यांना केला. आमच्या पक्षाचे आमदार कार्लोस फेरेरा हळदोणेचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या कामात तुम्ही हस्तक्षेप करण्याची गरज नाही. यापेक्षा तुम्ही आराम करा, असा सल्लाही श्री. पणजीकर यांनी दिला.

बार्देश तालुक्यासाठीचे रवींद्र भवन म्हापसा येथे उभारणीचे काम विविध कारणांनी रखडले आहे. कधी जागेवरून तर कधी स्थानिकांच्या विरोधामुळे रवींद्र भवनचे काम अडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 6 षटकार, 5 चौकार अन् 71 धावांची वादळी खेळी! युवराज सिंहने दाखवला जुन्या 'युवी'चा अंदाज, ऑस्ट्रेलियाला धू धू धुतलं

Goa Politics: 2012 मध्ये 8 भंडारी आमदार, आता मुख्यमंत्रिपदाची प्रतीक्षा; 2027 मध्ये समाजाचे राजकीय समीकरण काय?

Horoscope: 4 ऑक्टोबरचा दिवस ठरणार खास! 'या' राशींचं नशीब उजळणार; नोकरी-व्यवसायात मोठा फायदा, प्रेमजीवनही होईल सुखकर

God In Difficult Times: सुखात देवाचा विसर, दुःखात आर्त हाक; संकटांच्या काळातच का अधिक घट्ट होतं भगवंताशी नातं?

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

SCROLL FOR NEXT