CM Pramod Sawant Goa Dainik Gomantak
गोवा

BJP Goa: "देशाला सुराज्य श्रीरामांनी दिले तर रामराज्य पंतप्रधान मोदींनी" भाजपच्या स्थापने दिवशी मुख्यमंत्र्यांनी मानले पक्षाचे आभार

BJP Foundation Day: भारतीय जनता पक्षाच्या ४६व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने पणजी मुख्यालयावर पक्षाचा झेंडा फडकावून हा दिवस साजरा करण्यात आला

Akshata Chhatre

पणजी: भारतीय जनता पक्षाच्या ४६व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने रविवारी (दि. ६ एप्रिल) पणजी मुख्यालयावर पक्षाचा झेंडा फडकावून हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, "आजपर्यंत दादा आर्लेकर, बखले, दत्ता भिकाजी नाईक अशा कित्येक कार्यकर्त्यांनी भाजप पक्ष घडविण्यासाठी बलिदान दिले आहे. आज त्यांच्या योगदानामुळेच मी ह्या अध्यक्षपदावर विराजमान आहे. परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम् या धर्तीवरच भाजप पक्ष कार्य करत राहील. "

"काँग्रेस पक्ष सत्ता त्यांच्या हातात रहावी म्हणून घटनेला पायदळी तुडवत होता"

प्रथम देश, मग राज्य नंतर स्वतः ही भाजपची शिकवण आहे. कित्येक वर्षे अबाधित सत्ता असून काँग्रेसने देशाचे कल्याण केले नाही आणि म्हणून आज अडचणींना तोंड द्यावे लागतेय. गेल्या ११ वर्षांच्या भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या मार्गावर आहे.

आज घटनेच्या गोष्ट करणारा काँग्रेस पक्ष सत्ता त्यांच्या हातात रहावी म्हणून घटनेला पायदळी तुडवत होता. आज केंद्रात भाजप पक्षाकडे बहुमत असून सुद्धा आम्ही इतर मित्रपक्षांना सोबत घेऊन पुढे जात आहोत असे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.

"राष्ट्र सर्वतोपरी"

अखंड भारताचे स्वप्न साकार करण्यासाठीच आम्ही राजकारण करतो हे श्यामाप्रसाद मुखर्जींचे ब्रीदवाक्य कार्यकर्ते विसरले नाहीये. राष्ट्र सर्वतोपरी याच भावनेने भाजप कार्यकर्ते काम करतात. त्यावेळीच जनसंघाचे नेते जगन्नाथ राव जोशी यांचाही गोवा मुक्तीलढ्यात सहभाग होता. भाजप पुढील १०० वर्ष कार्यरत असणार म्हणून कदंबा पठारावर नवीन मुख्यालय तयार करतोय. देशाला सुराज्य प्रभू श्रीरामांनी दिले तर रामराज्य पंतप्रधान मोदींनी. जनतेची सेवा करण्यास ६ वर्ष दिल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पक्षाचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

SCROLL FOR NEXT