राष्ट्रीय महिला संसद, राष्ट्रीय युवा संसद (National Youth Parliament) आणि राष्ट्रीय पंचायत संसद आयोजित केल्या आहेत.  Dainik Gomantak
गोवा

'संसदे’तून नेतृत्व गुणांना वाव!

दैनिक गोमन्तक

पणजी: ‘लोकशाहीचा उत्सव’ अंतर्गत गोवा विधानसभा (Goa Assembly), गोवा सरकार (Government of Goa) आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (MIT School of Government) यांच्यावतीने राष्ट्रीय महिला संसद, राष्ट्रीय युवा संसद (National Youth Parliament) आणि राष्ट्रीय पंचायत संसद आयोजित केल्या आहेत. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी (Dr. Shyamaprasad Mukherjee) सभागृहात 8 ते 12 नोव्हेंबर या दरम्यान ह्या संसद (Parliament) होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. यावेळी यावेळी सभापती राजेश पाटणेकर, सचिव रवी धवन उपस्थित होते.

गोवामुक्तीच्या हिरक महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील महिला युवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींसाठी या संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. या संसदेसाठी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, हेमंत बिस्वा शर्मा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, नरेंद्र सिंग तोमर, अनुराग ठाकूर, किरण जीजूजी, सुमित्रा महाजन, किरण बेदी, सुधांशु त्रिवेदी, राजवर्धन राठोड, अजित डोवल, सुधा मूर्ती, आनंद महिंद्रा, अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर, विजय पाटकर, मंदाकिनी आमटे, सोनम वांगचुक बी. के. शिवानी, नीता अंबानी, श्रीनिवास धेंपे, सुलक्षणा सावंत, वर्षा उसगावकर यांंना आमंत्रित केले आहे.

कलागुण, नेतृत्व गुणांना मिळणार वाव

महिलांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांना विविध क्षेत्राची माहिती व्हावी, यासाठी उत्तर गोव्यातल्या महिलांसाठी 8 नोव्हेंबर तर दक्षिण गोव्यातल्या महिलांसाठी 9 नोव्हेंबरला ह्या संसद होतील तर युवकांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास आणि विविध क्षेत्राची माहिती व्हावी, यासाठी 10 नोव्हेंबरला उत्तर गोव्यातील युवकांसाठी 11 नोव्हेंबरला दक्षिण गोव्यातील तरुणांसाठी तर १२ नोव्हेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रतिनिधींसाठी या संसद होतील, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT