Taxi
Taxi Dainik Gomantak
गोवा

Mopa Taxi Counter : ‘मोपा’वर काळ्यापिवळ्या टॅक्सींना स्टॅण्ड द्या : टॅक्सी असोसिएशन

दैनिक गोमन्तक डिजिटल

मोपा विमानतळासाठी जागा गेलेल्यांना मुख्यमंत्र्यांनी व आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे 30 एप्रिलपर्यंत अधिसूचना काढून विमानतळावर पिवळ्या काळ्या टॅक्सींना स्टॅण्ड द्यावे, अन्यथा 1 मेपासून आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा ग्रीन लॅंड मोपा ॲअर पोर्ट टॅक्सी असोसिएशन व मोपा लोकल टॅक्सी असोसिएशनने दिला आहे.

ॲड. प्रसाद शहापूरकर म्हणाले की, आमच्या दोन्ही संघटना एकसंघ आहेत. अफवा पसरवण्याचे काम काही लोक करीत आहेत. त्याला कोणीही बळी पडू नये. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिलेले आश्वासन पाळावे, अन्यथा 1 मे रोजी कामगार दिनी मोपा विमानतळाच्या गेटबाहेर प्रखर आंदोलन छेडण्यात येईल.

ताम्हणकर विघ्नसंतोषी

स्थानिकांवर अन्याय करत स्थानिकांना स्वतंत्र टॅक्सी स्टॅण्ड मिळू नये यासाठी खो घालणारे खरे विघ्नसंतोषी सुदीप ताम्हणकर आहेत, असा आरोप गजानन गडेकर यांनी केला. पहिल्या आंदोलनावेळी मुख्यमंत्र्यांनी या व्यक्तीला आपणापर्यंत आणू नका असे सांगितले होते.

ग्रीनफिल्ड असोसिएशनचे अध्यक्ष उदय महाले व स्थानिक टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुवेक गावस यांनी आमची मागणी दिलेल्या मुदतीत मान्य न झाल्यास सर्वांनी १ मे रोजी आंदोलनास सज्ज राहावे, असे आवाहन केले.

सत्ताधाऱ्यांना आश्‍वासनांचा विसर

ॲड. जितेंद्र गावकर म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पत्रकार परिषदेतून स्थानिकांना आश्वासन दिले होते. त्या आश्वासनांचा दोघांनाही विसर पड आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वतीने सुदीप ताम्हणकर यांनी नागझर येथील नाना शेट सभागृहात आयोजित मेळाव्यात 22 एप्रिल रोजी अक्षय तृतियेच्या शुभमुहूर्तावर मोपा विमानतळावर स्थानिकांसाठी स्वतंत्र टॅक्सी स्टॅण्ड देण्याचे आश्वासन देऊन युवकांना फसवले आहे.

ज्या जागेत हा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहिला आहे, ती जागा मोपा पीडित शेतकऱ्यांची आहे. त्यासाठी विमानतळासाठी स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये. तसेच टॅक्सी व्यवसायात पेडणेकरांबरोबरच स्थानिकांना प्राधान्य हवे. यासाठी हा लढा सुरूच राहणार आहे. यात खो घालण्याचे आम्ही नाही, तर विघ्नसंतोषी काम सुदीप ताम्हणकर करत आहेत.

- भास्कर नारूलकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT