Pissurlem Tap Water shortage  Dainik Gomantak
गोवा

Pissurlem Water Issue: नळाला अर्धा दिवस तरी पाणी द्या; पिसुर्ले ग्रामस्थांचा टाहो, हायकोर्टात धाव...

खाणकाम बंद झाल्याने पाणी पुरवठा टँकरही बंद, पाण्याच्या टाकीसाठीही खाणमालकांवरच अवलंबून

गोमंतक ऑनलाईन टीम

Pissurlem Water Issue: पिसुर्ले येथील खाणकाम थांबले आहे. तथापि, खाणकामामुळे येथील भूजल आणि विहीरींचे पाणी आटले आहे. त्यामुळे सध्या पिसुर्लेत ग्रामस्थांची पाण्याविना गैरसोय होत असून ग्रामस्थांनी नळाला किमान अर्धा दिवस तरी पाणी मिळवे, या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

खाणकाम सुरू असताना कंपन्यांनी पिसुर्लेकरांची मर्जी राखण्यासाठी पाण्याचे टँकर पुरवले. त्यामुळे प्रत्येक घराबाहेर पाण्यासाठी एक निळ्या रंगाचे बॅरेल हे येथील परिचित दृश्य बनले होते. परंतु खाणकाम बंद होताच टँकरही बंद झाले.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांच्या मते, खाण मालक असलेल्या जमिन मालकांकडून एनओसी मिळाल्यावर गावात नवीन पाण्याची टाकी बांधली जाऊ शकते.

दरम्यान, पिसुर्लेचे सरपंच देवानंद परब म्हणाले की, “पूर्वी खाण कंपन्यांकडून टँकरने पाणी मिळायचे. पाडोशे ट्रीटमेंट प्लांटमधून पाणी मिळायचे. काही ठिकाणी विहिरीतून पाणी काढण्यासाठी पंप बसवले आहेत.

शिंगणे येथे पाण्याची टाकी बांधण्याची योजना सुरू असून त्यासाठी 14 लाख खर्च येणार आहे. मात्र, खाण मालकाकडून एनओसी मिळणे बाकी असल्याने काम सुरू व्हायचे आहे. एनओसी दिल्यास, लगेच काम सुरू करू शकतो.

ग्रामस्थ सांगतात की, विहिरीत पाणी नाही; गावातील झरा आणि नदी कोरडी पडली आहे. आम्ही हायकोर्टात याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेच्या आधारे हायकोर्टाने पीडब्ल्यूडीला पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले होते. सकाळच्या वेळेत नळाला पाणी मिळते.

तरीही, पिसुर्ले पंचायतीमधील पणशे आणि शिंगणे वॉर्डांना पाणीपुरवठा होत नाही. पंधरा वर्षांपूर्वी वाळपईच्या पाणीपुरवठा विभागाने या प्रभागात पाण्याची मुख्य पाइपलाइन टाकली, पण आजतागायत नळांना योग्य पाणीपुरवठा होत नाही.

दरम्यान, मोले येथे 15 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र बांधले जात आहे. त्यातून पिसुर्ले, होंडा आणि मोलेची पाणी टंचाईची समस्या लवकरच दूर होईल,” असे PWD तील पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

SCROLL FOR NEXT