Praveen Arlekar Dainik Gomantak 
गोवा

'पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकरांना मंत्रिपद द्या'

भाजप कार्यकर्ते एकवटले; मुख्‍यमंत्र्यांनी आश्‍‍वासनपूर्ती करण्‍याची मागणी

दैनिक गोमन्तक

मोरजी: पेडणेचे भाजप आमदार प्रवीण आर्लेकर यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी जोरदार मागणी मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांनी केली. आज त्‍यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक दिली व आपली मागणी पुढे रेटली.निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रवीण आर्लेकर यांना विजयी करा, ते आमदार झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, अशी ग्वाही दिली होती. ते वचन आता मुख्यमंत्री सावंत यांनी पाळावे आणि पेडणेचा सन्मान करावा अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली.

यावेळी तोरसेचेचे माजी सरपंच सूर्यकांत तोरसकर, माजी सरपंच संगीता गावकर, मोपा उपसरपंच सुबोध महाले, धारगळ सरपंच भूषण नाईक, पेडणे भाजप मंडल अध्यक्ष तुळशीदास गावस, जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर, नरेश कोरगावकर, पेडणे नगराध्यक्षा उषा नागवेकर, माजी नगराध्यक्ष स्मिता कुडतरकर, माजी सरपंच शशिकांत महाले, नगरसेविका तृप्ती सावळ देसाई, नगरसेविका विशाखा गडेकर, अश्विनी पालेकर, नगरसेवक शिवराम तुकोजी, उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर, विनिता मांजरेकर, सूर्यकांत तोरस्कर, सरपंच अशोक सावळ, माजी सरपंच बबन डिसोझा, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, युवा कार्यकर्ते कृष्णा पालेकर, भारती सावळ, अशोक धाऊसकर, देवानंद गावडे, आपा केणी, शंभा वारंग आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT