MLA Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet: मला नको मायकल लोबोंना करा मंत्री! साळगावच्या आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Goa Cabinet Reshuffle: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्याबाबत सूतोवाच केले होते.

Pramod Yadav

पणजी: राज्याच्या मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरु आहेत. काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये पक्षांतर करुन आलेल्या आमदारांना मंत्रीपद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. यापैकी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि आमदार मायकल लोबो यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मायकल लोबोंना मंत्रीपद देण्यात यावं, अशी मागणी आता साळगावचे आमदार केदार नाईक यांनी केली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्याबाबत सूतोवाच केले होते. मंत्रीमंडळ फेरबदलच्या चर्चेत मुख्यमंत्री सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दोघांकडे मंत्रीपद जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर आता साळगावचे आमदार केदार नाईक यांनी मायकल लोबो यांच्यासाठी मंत्रीपदाची मागणी केली आहे. लोबो यांना मंत्रीपद मिळाल्यास बार्देश तालुक्यातील रखडलेली कामे पूर्ण होतील, असा दावा त्यांनी केला आहे.

"मंत्रीमंडळ फेरबदलाचा निर्णय पक्ष आणि मुख्यमंत्री सावंत घेतील. मी जिथे आहे तिथे खुश आहे, हे मला स्पष्ट करायचेय की, पक्षात अनेक वरिष्ठ नेते आहेत. कळंगुटचे आमदार मायकल लोबो मंत्रीपदासाठी योग्य आहेत. लोबो यांना मंत्रीपद मिळाल्यास बार्देश तालुक्याची ताकद वाढेल आणि तालुक्यातील रखडलेली सर्व कामेही पूर्ण होतील", असे आमदार केदार नाईक म्हणाले.

मायकल लोबो यांना मंत्रीपद मिळाल्यास २०२७ च्या निवडणुकीत बार्देश तालुक्यातून आम्ही सर्वाधिक जागा निवडून आणू, असा दावा देखील केदार नाईक यांनी केला आहे. लोबो यांना मंत्रीपद देण्यात यावे अशी मी विनंती करतो, असे नाईक म्हणाले.

गोवा मंत्रीमंडळचा फेरबदल गेल्या वर्षापासून रखडला आहे. आधी लोकसाभा निवडणूक त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक यामुळे फेरबदलाचा निर्णय लाबंणीवर पडत गेला. नव्या वर्षात पुन्हा या चर्चांना उधाण आले होते दरम्यान, विधानसभेच्या अधिवेशनात हा विषय मागे पडला. नवे प्रदेशाध्यक्ष लवकर निर्णय घेतील अशी अपेक्षा होती. त्यानंतर आता पहलगाम येथील दहशतवादी हल्लामुळे केंद्रीय नेते व्यस्त असल्याने फेरबदल लांबणीवर पडल्याचे सांगितले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT