Vijay Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai : गोव्यात मुली असुरक्षित; कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रित करण्यात मुख्यमंत्री अपयशी

दोन वर्षांत 82 अल्पवयीनांचे अपहरण; कडक उपाय योजना हवी

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोव्यात अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. गोव्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. 2021 मध्ये 34, तर 2022 मध्ये 48 अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

मागच्या दोन वर्षात 82 अल्पवयीनांचे अपहरण करण्यात आले आहे, अशी माहिती गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी दिली.

ते म्हणाले, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रित करण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. राज्यात कोणताही पुरुष, महिला किंवा बालक सुरक्षित नसल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला.

पोलिसांनी 2021 मध्ये 32 प्रकरणे शोधून काढून पीडित मुलींना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले असले तरी अद्याप दोन अल्पवयीन मुलींचा शोध लागलेला नाही. विजय सरदेसाई यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रित करण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरल्याची टीका केली आहे.

गोव्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने राज्यातील मुली असुरक्षित आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी आणि एकूणच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी कडक उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

अज्ञात मृतदेहांची संख्या धक्कादायक

मागील काही दिवसांपासून गोव्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून चोऱ्या, खून, घरफोडी, अपहरणासारख्या घटनांचे प्रमाण लक्षणीय आहे.

2020 मध्ये गोव्यात 354 अज्ञात मृतदेह सापडले असून 2021 मध्ये 424, तर 2022 मध्ये 437 अज्ञात मृतदेह सापडल्याची नोंद झाली आहे. चालू वर्षातील 13 मार्चपर्यंत राज्यात 83 अज्ञात मृतदेह आढळून आल्याची नोंद झाली आहे याबद्दलही सरदेसाई यांनी चिंता व्यक्त केली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

SCROLL FOR NEXT