Goa Politics: होंडा येथे संपावर बसलेल्या कामगारांना भेटून चर्चा करताना गिरीश चोडणकर, रणजीत राणे, रोशन देसाई व इतर Dainik Gomantak
गोवा

गिरीश चोडणकरांचा 'मुख्यमंत्र्यांना' टोला

गोव्यातील जनतेचे दुर्दैव असून खाण बंदीमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असताना सरकार औद्योगिक कामगारांना सुद्धा बेकारीच्या खायित लोटण्याचा प्रयत्न करीत आहे; गिरीश चोडणकर

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: पर्ये मतदार संघात येणाऱ्या होंडा औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या एसीजीएल कंपनीच्या कामगारांनी आपल्या हक्काच्या मागण्या कंपनी मान्य करीत नसल्याच्या निषेधार्थ साडेतीन वर्षे वाटाघाटी करून शेवटचा पर्याय म्हणून दि 18 रोजीपासून पुकारलेल्या पाच दिवसांच्या संपाला राजकीय स्तरावरून वाढता पाठिंबा मिळत असून काल तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते लुईजीन फालेरो गेल्या नंतर आज दुपारी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी संपास बसलेल्या कामगारांची भेट दिली व त्यांना पक्षाच्या वतीने पुर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे.

यावेळी गिरीश चोडणकर यांनी कामगारांना संबोधित करताना सांगितले की गोव्यातील जनतेचे दुर्दैव असून खाण बंदीमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असताना सरकार औद्योगिक कामगारांना सुद्धा बेकारीच्या खायित लोटण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यामुळे काही प्रमाणात सरकारांची भागिदारी असलेल्या या आस्थापनांमधील कामगार तीन दिवसांपासून रस्त्यावर बसले असताना सुद्धा कामगारांच्या बाबतीत असंवेदनशील बनलेल्या या सरकारने या कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने त्यांच्या शेजारी मतदार संघात एवढ्या मोठ्या संख्येने कामगार हक्कांसाठी रस्त्यावर बसले असताना त्यांनी कोणतीच दखल घेतली नाही, वेळ पडल्यास मुख्यमंत्री हा प्रश्न पाच मिनिटांत सोडवू शकतात, पण कंपनीचे हीत पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यां कडून हे होऊ शकत नाही त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदी राहण्याचा कोणताच नैतिक अधिकार नाही, त्यामुळे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा त्वरित राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी यावेळी गिरीश चोडणकर यांनी केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत राणजित राणे, वाळपई महीला कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा रोशन देसाई, रमेश पणसेकर कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांत या कामगारांना बराच पाठिंबा लाभणार असून, आज कामगारांनी वाळपई शहरात मोर्चा काढून आपला निषेध नोंदविला उद्या दि 21 रोजी होंडा ते साखंळी पर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT