Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Goa Politician Scandal: 'मी कोणाचेही नाव घेतले नाही'; सेक्स स्कँडल प्रकरणावर चोडणकरांचे स्पष्टीकरण

एक मंत्री सेक्स स्कॅन्डलमध्ये गुंतला असल्याचे काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी ट्विट केले होते

गोमन्तक डिजिटल टीम

Girish Chodankar Statment On Goa Politician Sex Scandal Case: "सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असलेला ज्येष्ठ मंत्री कोण आहे?' याची चौकशी करून सांगावे, असा प्रश्न मी उपस्थित केला होता. याबाबत चौकशी करण्याचे आवाहन प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि पोलिस खात्याला केले होते."

"सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असलेल्या मंत्र्याचे किंवा पीडित महिलेचे नाव मी घेतलेले नाही" असे स्पष्टीकरण कॉंग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे कायम निमंत्रित गिरीश चोडणकर यांनी दिले.

गोव्यातील कॅबिनेट मंत्री सेक्स स्कॅन्डलमध्ये गुंतला आहे का, याचे उत्तर मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि भाजपने द्यावे, अशी मागणी शनिवारी चोडणकरांनी ट्विटरद्वारे केली होती. यानंतर सोशल मीडियावर मंत्री व त्या महिला पंच सदस्याचा फोटोही व्हायरल झाला होता.

"चोडणकरांनी राजकीय लाभापोटी असा आरोप केला आहे अशी प्रतिक्रिया महिला पंच सदस्याने दिली होती.

यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चोडणकर म्हणाले, "सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असलेल्या मंत्र्याचे किंवा पीडित महिलेचे नाव मी घेतलेले नाही. सहभागी असलेला ज्येष्ठ मंत्री कोण आहे?' याची चौकशी करून सांगावे अशी मागणी मी केली होती."

"या प्रकरणातील मंत्र्याची चौकशी करुन त्यांचे नांव लोकासमोर आणण्याऐवजी, काही घटकांनी स्वताच्या फायद्यासाठी या मुद्द्याचा वापर केला आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. कोणाच्या वैयक्तिक जीवनावर आणि स्वातंत्र्यावर परिणाम होईल अशा पोस्ट आपण करू नये."

"तसेच मंत्री असलेल्या व्यक्तीने आपल्या अधिकाराचा फायदा घेऊन स्त्रीचा वापर करून तिचे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करू नये. माझ्या पोस्टमध्ये कोणत्याही स्त्री-पुरुषाचे नाव, कोणताही फोटो पोस्ट केला गेला नाही. कोणत्याही महिलेचा अनादर करणारी टिप्पणी नव्हती" असे चोडणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्री माविन, बाबूश यांना दिलासा, 'त्‍या' बहुचर्चित प्रकरणांना आव्‍हान न देण्‍याचा पोलिसांचा निर्णय

Goa Cyber Crime: दररोज 15 गोमंतकीय सायबर जाळ्यात! गुन्हेगारीचा वाढतोय फास; राज्यात सहा महिन्यांत 2,637 जणांना गंडा

Amit Shah Goa visit: भाजपच्या हालचालींना वेग; अमित शहा 7 सप्टेंबरला गोव्यात, बी. एल. संतोषही पुढील महिन्यात दौऱ्यावर

Sexual Assault Case: 4 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, खोर्ली-म्हापशात घृणास्पद कृत्य; स्थानिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या दिलं ताब्यात

Horoscope: रवि प्रदोष आणि मासिक शिवरात्रीचा दुहेरी योग! 'या' राशींवर महादेवांची विशेष कृपा, यश-समृद्धीचे संकेत

SCROLL FOR NEXT