Girish Chodankar | Goa Political News  Dainik Gomantak
गोवा

Girish Chodankar : पणजी, कुडचडेत धुळीचे साम्राज्‍य; खबरदारीचे उपाय करा

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची मागणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

Girish Chodankar : राजधानी पणजी तसेच पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, त्या कुडचडेत सध्या धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना खबरदारीचे उपाय योजण्यास सूचित करावे, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे.

पणजी शहरासह राज्यात विविध ठिकाणी चालणाऱ्या अस्ताव्यस्त रस्ते खोदकामांमुळे सगळीकडे धूळ पसरली आहे. राजधानीची अवस्था अत्यंत वाईट आहे. पर्यावरणमंत्री काब्राल यांच्या कुडचडेतही खोदकामामुळे रस्त्यांची अवस्था वाईट बनली आहे.

रहिवासी आणि प्रवाशांची गैरसोय होत असून, त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना श्‍वसनाचा त्रास होत असल्याचे चोडणकर यांनी नमूद केले आहे.

रस्त्यावर खोदलेले खड्डे काम पूर्ण होऊनही नीट भरले जात नसल्याने रस्त्याच्या कडेला चिखल साचला आहे. धुळीचा निपटारा करण्यासाठी आवश्यक पाण्याचा शिडकावासुद्धा केला जात नसल्याचे मंडळाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्‍न केला आहे, असे चोडणकर म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT