Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Girish Chodankar: 11 आमदार पळवण्याचा भाजपचा होता 'डाव'

Goa Congress Rebel: माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी असा आरोप केला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Congress Rebel: काँग्रेस पक्षाचे 8 आमदार फुटले असून मुळात 11 आमदार पळवण्याचा भाजपचा डाव होता. त्यासाठी अफाट पैसे देखील देण्यात आले होते. एका राजकारण्याने काही आमदारांना पैशांचे बॅग देखील उघड करून दाखवले होते.

आमदार खरेदी करण्यासाठी पैसे आसाम येथून आले होते, कारण आसामच्या मुख्यमंत्र्यांवर पक्षांतराची जबाबदारी दिली होती, असा आरोप माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (State President Girish Chodankar) यांनी केला आहे. एका वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शपथ घेण्याचा निर्णय हा त्यावेळी उमेदवारांनीच घेतला होता. तो आम्ही मान्य केला, तेवढेच. मात्र आज पक्षांतर केल्यानंतर आमदार वेगळीच भाषा बोलतात. दिगंबर कामत यांच्या तोंडात तर सतत देव असूनही आज त्यांनी देवाचा विश्‍वासघात केला आहे, असे चोडणकर म्हणाले.

मानहानीचा खटला: माझ्यावर उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केले जात आहे. माजी आमदार आग्‍नेल फर्नांडिस यांनी आरोप करून मला देवळात येण्याचे आव्हान दिले आहे. त्यांचे आव्हान मी स्वीकारले असून त्यांनी ठिकाण निश्‍चित करावे. त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला चालवणार आहे, असेही चोडणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT