Girish Chodankar News dainik gomantak
गोवा

गिरीश चोडणकरांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

गोव्यातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्याची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या खराब कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा चोडणकरांनी दिला आहे. गिरीश चोडणकरांनी आपला राजीनामा हायकमांडला पाठवल्याची माहिती गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी दिली आहे. (Girish Chodankar News)

40 सदस्यीय गोवा विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत (Goa Election) गिरीश चोडणकर काँग्रेसचे नेतृत्त्व करत होते. या निवडणुकीच काँग्रेसने 11 जागा जिंकल्या आणि त्याचा मित्रपक्ष गोवा फॉरवर्ड पार्टीला एक जागा मिळाली, तर भाजप 20 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 10 मार्च रोजी मतदानाचा निकाल जाहीर झाल्यानंतर चोडणकर यांनी आपल्या पक्षाच्या खराब प्रदर्शनाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. चोडणकर यांचा राजीनामा स्वीकारण्यात येणार असून त्यांच्या जागी नवा चेहरा येणार असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे.

गिरीश चोडणकरांच्या राजीनाम्यानंतर संकल्प आमोणकर, अॅलेक्स सिक्वेरा आणि एल्विस गोम्स हे नेते काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष पदासाठी आघाडीवर असल्याची माहिती आहे. संकल्प आमोणकर आणि सिक्वेरा यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला, तर गोम्स यांनी पणजी (Panjim) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, ज्यात बाबूश मोन्सेरात यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मडगावचे आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांचं नावही पक्षाकडून विचारात घेतलं जाण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT