Rahul Gandhi & Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Girish Chodankar Meets Rahul Gandhi: चोडणकरांनी घेतली राहुल गांधींची भेट; पक्षाच्या उभारीवर चर्चा

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : शपथा, आणाभाका घेत निवडून आलेल्या काँग्रेस आमदारांच्या पक्षांतरानंतर पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी जुने आणि नवे कार्यकर्ते सक्रिय होताना दिसत आहेत. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ‘भारत जोडो’ पदयात्रेत सहभाग नोंदवत राज्यातील काँग्रेसच्या उभारीसाठी राहुल गांधी यांच्याबरोबर दीर्घ चर्चा केली. (Girish Chodankar Meets Rahul Gandhi)

मागील विधानसभेत काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांसह 10 आमदारांनी पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे विरोधी भाजप, आपसह तृणमूलने गत विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे आमदार निवडून आल्यानंतर पक्षांतर करतात हा प्रचाराचा मुद्दा केला होता. यामुळे ‘बॅक फुट’वर गेलेल्या कॉँग्रेसच्या उमेदवारांनी मंदिर, मशीद, चर्च आणि गुरुद्वारामध्ये जात आपण पक्ष एकसंध ठेवू आणि कोणत्याही स्थितीत पक्षांतर करणार नाही, अशा शपथा आणि बॉण्डवर लिहून दिले होते.

तरीही 8 आमदारांनी अखेर पक्षांतर केलेच. यामुळे राज्यात विरोधी पक्ष अस्तित्वात आहे की नाही? काँग्रेसचे उच्चाटन झाले की काय? असे प्रश्न सतावत असतानाच पक्षाच्या उभारीसाठी आता नव्याने जुने-नवे कार्यकर्ते सक्रिय होताना दिसत आहेत.

कॅप्टन विरियतो फर्नांडिस यांनी रेती व्यावसायिकांचा प्रश्न घेऊन सरकारवर टीकेची झोड उठवली, तर उत्तर गोव्यात जिल्हाध्यक्ष विजय भिके यांनी माध्यान्ह आहाराबाबतचे प्रश्न उपस्थित करत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे उरलेल्या 3 आमदारांपैकी हळदोणे येथील आमदार कार्लोस फेरेरा यांनी मतदारसंघातील आरोग्यविषयक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले.

हे सारे घडत असताना पक्षाचे नेते राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने पदयात्रा काढत आहेत. या पदयात्रेमध्ये यापूर्वी पक्षाध्यक्ष अमित पाटकर, युरी आलेमाव यांनीही सहभाग नोंदवला होता.

लोकांमध्ये मिसळा, लोकसंपर्क वाढवा

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राहुल गांधी यांच्याबरोबर पदयात्रेत सहभाग नोंदवत राज्यातील पक्षवाढीबाबत विविध विषयांवर चर्चा केली. लोकांमध्ये मिसळा, लोकसंपर्क वाढवा, तरुण प्रामाणिक कार्यकर्त्यांना वाव द्या, असा सल्ला राहुल गांधी यांनी दिल्याची माहिती चोडणकर यांनी दिली.

देशभरात अनेक काँग्रेसविरोधकही आता राहुल गांधींच्या विचाराला मान्यता देऊन ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होत आहेत. यात युवक आणि महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. हे नव्या भारताच्या उभारणीसाठी नक्कीच आशादायी आहे.

- गिरीश चोडणकर, काँग्रेस नेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT