Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Datta Naik Case: नाराज लोकांचे लक्ष वळवण्‍यासाठीच 'दत्ता नायक' प्रकरण, चोडणकरांचे घणाघाती आरोप

Girish Chodankar: भ्रष्टाचारासह अनेक मुद्दे ऐरणीवर असताना मुख्‍यमंत्र्यांना दत्ता नायक प्रकरण त्‍याहून जास्‍त महत्‍वाचे वाटते, ही आश्‍चर्याची बाब आहे, असे चोडणकर यांनी म्‍हटले आहे.

Sameer Panditrao

Girish Chodankar About Datta Naik Case

मडगाव: राज्यात ‘कॅश फॉर जॉब’, जमीन रुपांतरणे, वाढलेला भ्रष्‍टाचार, अशी अनेक ज्‍वलंत प्रकरणे चर्चेत असून लोक त्‍यामुळे सरकारवर नाराज आहेत. अशा नाराज लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्‍यासाठीच मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत पोलिसांचा वापर करून दत्ता नायक वक्‍तव्‍य प्रकरण गाजवू पहात आहेत, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

भ्रष्टाचारासह अनेक मुद्दे ऐरणीवर असताना मुख्‍यमंत्र्यांना दत्ता नायक प्रकरण त्‍याहून जास्‍त महत्‍वाचे वाटते, ही आश्‍चर्याची बाब आहे, असे चोडणकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्‍हटले आहे.

चोडणकर यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्‍या पत्रकात गोव्‍यातील पोलिसच वेगवेगळ्‍या गुन्‍ह्यात गुंतले आहेत. गोव्‍यातील गुन्‍हेगारीने भयानक असे वळण घेतले आहे. सरकारी आशीर्वादाने काही माफिया बेरोजगार युवकांना सरकारी नोकऱ्या देण्‍याचे आश्‍वासन देऊन राजरोसपणे लुटतात आणि भूमाफिया लोकांच्‍या जमिनी बळकावतात.

या सर्व प्रकारांवर पांघरुण घालण्‍यासाठी दत्ता नायक यांच्‍या वक्‍तव्‍याचा मुद्दा मुद्दामहून सरकार मुख्‍य धारेत आणत आहे. गोवा पोलिसांकडे शेकडो गंभीर तक्रारी प्रलंबित आहेत, ज्यांची चौकशीच होत नाही. वास्‍तविक सरकारने अशा बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पण हे सरकार आपल्‍या कर्तव्‍यालाच विसरले आहे, असे एकंदर स्‍थिती पाहिल्‍यास वाटते असे चोडणकर यांनी आपल्‍या पत्रकात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

SCROLL FOR NEXT