Goa Shigmotsav 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav 2023: बोर्डेतील घोडेमोडणी जल्लोषात

कोराटीचे मळ येथे आल्यानंतर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत घोडेमोडणीला सुरवात झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Shigmotsav 2023: डिचोलीतील विविध भागात सध्या शिगमोत्सवाचे आकर्षण आणि पारंपरिक लोकनृत्य असलेल्या ‘घोडेमोडणी’चा उत्साह संचारला आहे.

ढोल-ताशांच्या ‘घणचे कटर घण’च्या तालावर गुरुवारी (ता. ९) सायंकाळी डिचोलीतील बोर्डे येथील घोडेमोडणी मोठ्या उत्साहात साजरी झाली.

सायंकाळी गावतड येथील श्री सातेरी मंदिराजवळील चव्हाट्यावर चार घोडे सजविण्यात आल्यानंतर गाऱ्हाणे घालण्यात आले. वाजतगाजत घोडे कोराटीचे मळ येथे आल्यानंतर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत घोडेमोडणीला सुरवात झाली.

श्री वडेश्वर देवस्थानकडून भायलीपेठ ते श्री शांतादुर्गा सर्कलपर्यंत असे पाच फेरे मारल्यानंतर घोडे पुन्हा वडाजवळ आले. त्या ठिकाणी घोड्यांची पूजा आदी पारंपरिक विधी झाल्यानंतर घोड्यांचे गावतड येथे प्रस्थान होऊन घोडेमोडणीची उत्साहात सांगता झाली.

घोडेमोडणीचा आनंद घेण्यासाठी लोकांनी भायलीपेठ मार्गाच्या दुतर्फा गर्दी केली होती. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये हे सुद्धा घोडेमोडणीच्या उत्साहात सहभागी झाले होते. त्यांनी घोडेमोडणीचा आनंद घेतला.

आज पाच ठिकाणी घोडेमोडणी:-

शुक्रवारी (ता. १०) डिचोली शहरासह सर्वण, मये, कुडचिरे आणि लाडफे मिळून पाच ठिकाणी परंपरेप्रमाणे घोडेमोडणी साजरी होणार आहे.

गावकरवाडा येथील श्री शांतादुर्गा देवस्थान आणि लाडफे येथील श्री सातेरी केळबाई देवस्थानची घोडेमोडणी सायंकाळी तर मये येथील श्री माया केळबाय देवस्थान, कुडचिरे आणि सर्वण येथील श्री कुळमाया सातेरी श्यामपुरुष देवस्थानची घोडेमोडणी रात्री साजरी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MI VS RCB: 6,4,6,4... नॅडिन डी क्लार्कची झुंजार खेळी, आरसीबीनं मुंबईच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास Watch Video

Shukra Budh Yuti 2026: धनिष्ठा नक्षत्रात 'लक्ष्मी-नारायण' योग: 'या' 4 राशींना मिळणार अपार यश आणि धनदौलत!

Goa Nightclub Fire: 'बर्च' घटना अपघात म्हणून सोडून द्यावी? 25 जण जिवंत जळाले तरी सरकार गप्प का? युरी आलेमाव यांचा सवाल

Chimbel Unity Mall: चिंबल 'युनिटी मॉल'चा फैसला 14 तारखेला! सत्र न्यायालयात 'जीटीडीसी' आणि याचिकाकर्त्यांमध्ये जोरदार युक्तिवाद

Kushavati District: 'कुशावती' जिल्ह्यामध्ये काणकोणचा समावेश नको, ...अन्यथा तीव्र आंदोलन; श्रीस्थळ येथील बैठकीत ठराव

SCROLL FOR NEXT