Sunburn Festival Goa 2024 Dainik Gomantak
गोवा

सनबर्न झाल्यास गोव्यात वातावरण बिघडू शकते, GFPK चा इशारा; महोत्सव बंदीसाठी Goa DGP सरकारला विनंती करणार?

sunburn goa 2024: महोत्सवात अमली पदार्थाचे सेवन होते यामुळे युवावर्गावर दुष्परिणाम होतात.

Pramod Yadav

Sunburn Goa 2024

पणजी: दक्षिण गोव्यातील सनबर्नला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असताना देखील महोत्सवाचे आयोजक या विरोधाला जुमानत नसल्याचे चित्र आहे. पण, महोत्सवावर बंदीची मागणी कायम असून, यासाठी आता गोव्याचे पोलिस महासंचालकांना साकडं घालण्यात आलं आहे.

गोंयचे फुडले पिळगे खातिर या संस्थेने पोलिस महासंचालकांना याबाबत पत्र दिले आहे.

गोवा पोलिसांचे प्रमुख या नात्याने दक्षिण गोव्यातील नियोजित सनबर्न महोत्सव रद्द करण्याची विनंती तुन्ही सरकारकडे करावी, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. गोव्यातील अनेक लोक या महोत्सवाला विरोध करत आहेत.

महोत्सवामुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि दैनंदिन जीवन विस्कळीत याचा विचार करुन महोत्सव रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

महोत्सवात अमली पदार्थाचे सेवन होते यामुळे युवावर्गावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे सनबर्न हद्दपार करणे आवश्यक आहे. पण नियोजित महोत्सव झाल्यास राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा संस्थेनी दिला आहे.

Goa Sunburn 2024

गेल्या काही दिवसांपासून गोव्यात नियोजित सनबर्न विरोधात गोमंतकीय आक्रमक झाले आहेत. दक्षिणच नव्हे तर गोव्यातून सनबर्न हद्दपार करण्याची मागणी केली जात आहे. सामाजिक संस्था सनबर्नला विरोध करत आहेत.

आता गोंयचे फुडले पिळगे खातिर या संस्थेने पोलिस महासंचालकांना निवेदन देऊन सरकारला महोत्सव बंदीसाठी विनंती करण्याची मागणी केली आहे. तसेच, महोत्सव झाल्यास राज्यातील वातावरण बिघडू शकते असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. तेव्हा पोलिस महासंचालक यासाठी सरकार अर्थात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT