Goa Shipyard Dainik Gomantak
गोवा

गोवा शिपयार्डमध्ये नोकऱ्या मिळाव्यात!

स्थानिकांना डावलल्याचा नंदादीप राऊत यांचा आरोप

दैनिक गोमन्तक

वास्को: येथील गोवा शिपयार्ड कंपनीमध्ये स्थानिकांना नोकरी दिली जात नसून, त्यांना मुद्दामहून डावलले जात असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी केला आहे.

वास्कोतील गोवा शिपयार्ड कंपनीत अंदाजे सातशेपेक्षा अधिक नोकऱ्या विविध विभागात असून, त्याची जाहिरात वृत्तपत्रात नुकतीच जाहीर केली होती. मात्र, या नोकऱ्या वास्कोबरोबर मुरगाव तालुक्यातील शिक्षित युवकांना संधी न देता इतर राज्यातील परप्रांतीयांना देण्याचे षडयंत्र गोवा शिपयार्डचे प्रशासन व कंपनीतील कामगार संघटना करीत असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.

राज्य सरकारला गृहीत धरून येथील युवकांना नोकरी न देता इतर राज्यातील युवकांना नोकरीची संधी देण्यात येत आहे. गेली अनेक वर्षे गोवा शिपयार्ड कंपनीने गोव्यातील युवकांवर एकप्रकारे अन्याय केला आहे. जर गोवा शिपयार्ड कंपनीने गोव्यातील तसेच स्थानिक युवकांना नोकरीत प्राधान्य दिले नाही तर मुख्य रस्ता अडवून कंपनी विरोधात आंदोलन छेडणार असल्याचे नंदादीप राऊत यांनी सांगितले.

...तर रास्ता रोको

विद्यमान प्रशासन व कामगार संघटनांनी नोकऱ्या देताना दुजाभाव करण्याचे प्रयत्न चालवले आहेत, असे नगरसेवक दीपक नाईक यांनी सांगितले. गोव्यातील शिक्षित युवकांना राज्य सरकारच्या नोकऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. गोवा शिपयार्डने येथील स्थानिक युवकांना नोकरी देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अन्यथा गोवा शिपयार्डसमोर रस्ता रोको करून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दीपक नाईक यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT