casino panaji 
गोवा

Casino In Mandovi: मांडवीतील कॅसिनोंना तत्वत: मान्यता, अंतिम दाखल्यासाठी 'हा' अहवाल सादर करावा लागणार

मांडवीत असलेल्या तरंगत्या कॅसिनोंना गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने तत्वत: मान्यता दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Casino In Mandovi: मांडवीत असलेल्या तरंगत्या कॅसिनोंना गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने तत्वत: मान्यता दिली आहे. दरम्यान, अंतिम दाखल्यासाठी नदीतील कॅसिनो चालकांना पर्यावरण घात मूल्यांकन अहवाल सादर करावा लागणार आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने 26 एप्रिल 2022 रोजीच्या आदेशात मांडवी नदीत किनारी नियमन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कॅसिनोंना किनारी नियमन क्षेत्राकडून मंजुरी अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले होते. सीआरझेड क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व कॅसिनोंवर लवादाने आदेशानुसार निर्बंध लागू केले होते. कॅसिनो कार्यरत ठेवण्यासाठी सीआरझेड मंजुरी गरजेचे असल्याचे लवादाने म्हटले होते.

GCZMA ला CRZ परवानगी मागणाऱ्या पाच कॅसिनो ऑपरेटरकडून अर्ज प्राप्त झाले होते. यात गोल्डन पीस इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (MV मॅजेस्टिक प्राईड), वर्ल्ड वाइड रिसॉर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड (MV लकी सेव्हन), हाय स्ट्रीट क्रूझ आणि एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड (MV Caravela आणि एमव्ही कॅसिनो रॉयल) आणि डेल्टा को-ऑप लिमिटेड (MV Horsehoe Casino) यांचा समावेश आहे.

दरम्यान, प्राधिकरणाच्या मागील महिन्यात झालेल्या बैठकीत कॅसिनो ऑपरेटरकडून सर्व वैध कागदपत्रे प्राप्त झाली आहेत. अशी माहिती देण्यात आली. मात्र, त्यापैकी कोणीही पर्यावरण घात मूल्यांकन (ईआयए) अहवाल सादर केला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात काँग्रेसची 'छात्रों की गुंज' मोहीम; पेपरफुटी, बेरोजगारीविरोधात राज्यात जनजागृती

Goa Heavy Rain: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! धावत्या कारवर कोसळले झाड; आई अन् दोन मुले सुखरूप

Goa Heavy Rain: साळ-खोलपेवाडी येथे घरावर कोसळला वृक्ष; दोन लाखांच्या मालमत्तेचे नुकसान, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

Goa Water Supply: धरणांमधील पाणी वाढवण्‍यावर आता जलसंपदा खात्‍याचे लक्ष; शुद्धीकरणासाठी 'पेयजल'क‍डून नद्यांतील पाण्‍याचा वापर

Borim Bridge: लाखो रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात बोरी पुलावर खड्डे; दुरुस्ती कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT