Gayatri Kadam won first prize in essay competition
Gayatri Kadam won first prize in essay competition Dainik Gomantak
गोवा

निबंध स्पर्धेत विद्यार्थी गटात गायत्री कदम प्रथम

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी: भाऊसाहेब बांदोडकर पुण्यतिथीनिमित्त उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी  ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेत विद्या प्रबोधिनी, पर्वरीची विद्यार्थिनी गायत्री बाळकृष्ण कदम हिने चार हजार रुपयांचे प्रथम बक्षीस पटकाविले.

३ हजार रुपयाचे द्वितीय बक्षीस सरकारी महाविद्यालय, खांडोळाचा विद्यार्थी गौरांग बाबुराव भांडीये याने तर २ हजार रुपयाचे तृतीय बक्षीस विद्या प्रबोधिनीचा राम देवू झोरे याने प्राप्त केले.

शासकीय महाविद्यालय, खांडोळाची विद्यार्थिनी वैशाली रवी कदम, गणपत पार्सेकर महाविद्यालय, हरमलची तेजल तुळशीदास नाईक व  शांतादुर्गा उच्च माध्यमिक, डिचोलीची चतुरा चंद्रशेखर नार्वेकर याना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणपद्धती : फायदे व तोटे’ या विषयावर घेतलेल्या निबंध स्पर्धेत पीपल्स विद्यालय, कामुर्लीचे शिक्षक उदय रवींद्र सामंत यांनी ५ हजार रुपयांचे प्रथम बक्षीस पटकावले.

४ हजार रुपयांचे द्वितीय बक्षीस कामाक्षी एज्युकेशन सोसायटी विद्यालय, कुर्टी-फोंडाची शिक्षिका समिक्षा शिरोडकर हिला तर ३ हजार रुपयाचे तृतीय बक्षीस सरकारी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक महेश चंद्रकांत कशालकर यांना प्राप्त झाले.

प्रत्येकी दीड हजाराची उत्तेजनार्थ बक्षिसे अनुक्रमे हनुमंत मायणीकर (नवदुर्गा विद्यालय, पाळी-डिचोली), अरुण महाबळ (केशव स्मृती विद्यालय, दाबोली-वास्को) व विठोबा बगळी (कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय, कोरगाव) या शिक्षकांना देण्यात आली. विजेत्यांना प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हेही प्रदान करण्यात आली.

संपादन: ओंकार जोशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

Pakistan Road Accident: पाकिस्तानात भीषण अपघातात, 20 ठार 15 जखमी; बचावकार्य सुरु

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

SCROLL FOR NEXT