Pernem News  Dainik Gomantak
गोवा

Ganesh Utsav 2022: पेडणे येथे गौरी पूजन उत्साहात

पाच दिवसीय गणेशाचे आज विसर्जन

दैनिक गोमन्तक

वास्को: भूतवाडी पेडणे येथे गौरी पूजन उत्साहात साजरे करण्यात आले.बहुतांश ठिकाणी घरातील गणेश उत्सव हा पाच दिवसांचा असतो. पाचव्या दिवशी गौरीचे पूजन करण्यात आले. तसेच पाचदिवसीय गणेशोत्सवाचे विसर्जनही आज रविवारी करण्यात आले. (Gauri Puja in Pernem)

जेष्ठ नक्षत्रावर गौरी आवाहन व पुजन करण्यात येते. वस्तिच्या म्हणजे एक दिवस राहून पुजन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुळ नक्षत्रावर देवीचे विसर्जन केले जाते. विसर्जनावेळी तीला भाजी व भाकरीचा नैवेध दाखवल्यानंतर सर्वांना भाजी व भाकरीचा प्रसाद दिला. अशी ही देवीची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली असून त्याच परंपरेने त्याच उत्साहात देवीचा सण साजरा व जतन केला जात आहे. परंपरेनूसार भूतवाडी पेडणे येथे गौरी पूजन उत्साहात साजरे करण्यात आले.

गौरी पूजनासाठी सुवासिनींनी नदी, विहिरीवर जाऊन तेथे कलशात पाणी भरून त्यावर श्रीफळ, आंब्याची डहाळी तसेच नथ व मंगळसूत्र व इतर दागिने घालून श्रृंगारले व कलश गौरीच्या स्वरूपात घरांमध्ये आणला. त्यावेळी दशात या कलशाला ओवाळले जाते. आपल्या घरात गौरी येत असल्याचे हे प्रतिक म्हणून चंदन किंवा गंध उगाळून सुवासिनी जेथे जेथे पाय ठेवतात तेथे हे चंदन लावण्यात आले जेणेकरून पदचिन्ह उमटेल या मागचा उद्देश आहे.

गौरीला औंशाचा नैवेद्यही दाखविला. लग्नानंतर ज्यांची पहिली चतुर्थी होती. त्या सुवासिनींच्या घरी विशेष औंशे होते. औंशे हळदीच्या पानावर भरुन त्यात प्रामुख्याने विविध प्रकारच्या फळांचे तुकडे, वडा (पुरीचा एक प्रकार) व इतर जिन्नस ठेऊन हे औंशे आपल्या गावातील मंदिरात सुवासिनींनी ठेवून देवतांचा आशीर्वाद घेतला व नंतर सर्वांना हे औंशे वाटण्यात आले.

गौरीचे विसर्जन केल्यानंतर पाच प्रकारच्या भाज्या एकत्रित करून केलेली भाजी व भाकरी सर्वांना नैवेद्य म्हणून वाटला ज्याला गौरीची भाकर असे संबोधले जाते. गौरी विसर्जनानंतर ज्यांच्या घरी पाच दिवसांचे गणपती आहेत, त्यांचे रात्री उशीरा विसर्जन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT