Dr. Gauri Achari Murder Case Dainik Gomantak
गोवा

गौरी आचारी खून प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात

जुने गोवे पोलिसांची माहिती : फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यावर त्वरित आरोपपत्र दाखल होणार

दैनिक गोमन्तक

पणजी : गेल्या जून महिन्यात गोव्याला हादरून सोडलेल्या खांडोळा महाविद्यालयाच्या प्राध्यापिका गौरी आचारी हिच्या खूनप्रकरणाचे तपासकाम अंतिम टप्प्यात असून फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडून काही अहवाल येणे बाकी आहेत.

हा अहवाल हाती मिळाल्यावर संशयित गौरव ब्रिदे याच्याविरुद्ध खुनाच्या तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केले जाईल. संशयित सध्या कोलवाळ कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या जुने गोवे पोलिस निरीक्षकांनी दिली.

गौरी या तरुणीचा गळा आवळून तिचा खून केलेल्या संशयित गौरव ब्रिदे याने कदंब पठारावरील झाडीत तिचा मृतदेह टाकून दिला होता. या प्रकरणाचा तपास जुने गोवेचे तत्कालिन पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांनी करताना संशयिताला 24 तासाच्या आत अटक केली. त्यानेही खुनाची कबुली दिली. त्यामुळे तपासकामातील साक्षीदार तसेच गौरी व गौरव यांच्यात घटनेच्या शेवटच्या क्षणी मोबाईलवरून झालेल्या संभाषणाची तसेच व्हॉटसअप मेसेजिस माहितीसाठी ते फॉरेन्सिक लेबोरेटरीकडे पाठवण्यात आले आहे. त्याचा अहवाल येणे बाकी आहे. घटनेपूर्वी त्याला गौरी हिच्यासोबत जुने गोवे येथील प्राईमरोजवळील इमारतीजवळ पाहिलेल्या काही साक्षीदारांच्या साक्षी पोलिसांनी नोंदवल्या आहेत.

गौरी हिच्या पालकांच्याही जबान्या नोंदवण्यात आल्या आहेत. तिने संशयितांसोबतची मैत्री नाकारल्याने त्याने हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने पोलिस कोठडीतील जबानीत खुनाची कबुली दिली आहे.

बिद्रे याला कोलवाळ कारागृहात ठेवण्यात आले आहे. 14 दिवसांनी त्याला न्यायालयीन कोठडी पणजी न्यायालयाकडून वाढवून घेतली जात आहे. गौरी हिच्या खुनानंतर त्याला पश्‍चाताप झाल्याचा किंवा त्याच्यावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. नेहमीप्रमाणे तो कारागृहात इतर कैद्यांबरोबर मिसळून असतो. खुनाच्या घटनेनंतर त्याला कोठडीत कोणीही भेटण्यास आले नसल्याची माहिती कारागृहातील एका कर्मचाऱ्याने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT