Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: प्रेयसीसाठी त्याने काढला पत्नीचा काटा! युवतीला साक्षीसाठी बोलावणार...

Goa Crime News: दीक्षा गंगवार खून प्रकरण: गुंतागुंत वाढली; गोवा पोलिसांपुढे आव्हान

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: दीक्षा गंगवार खून प्रकरणात आता नवीन माहिती पुढे येत असून दीक्षाचा पती गौरव कटियार याच्‍या मनाविरुद्ध जाऊन त्‍याच्‍या घरच्‍यांनी हे लग्‍न लावून दिले होते. त्‍यामुळे लग्‍न झालेल्‍या दिवसापासून त्‍याचे आपल्‍या पत्‍नीशी पटत नव्‍हते. त्‍यामुळेच दीक्षा लग्‍न झाल्‍यानंतर लगेच आपल्‍या माहेरी रहायला गेली होती अशी माहिती पुढे आली आहे.

संशयित गौरव याने पोलिसांना दिलेल्‍या माहितीनुसार, त्‍याचे लग्‍न होण्‍यापूर्वीच चेन्नईच्‍या एका युवतीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, हे संबंध त्‍याच्‍या घरच्‍यांना पसंत नव्‍हते.

त्‍यामुळेच दीड वर्षापूर्वी त्‍याच्‍या घरच्‍यांनी त्‍याचे दीक्षाशी लग्‍न लावून दिले. मात्र, हे लग्‍न होऊनही गौरव दीक्षाशी जुळवून घेऊ शकला नाही. त्‍यातूनच हा खून करण्‍यात आल्‍याची माहिती पुढे आली आहे.

18 जानेवारी रोजी काब - द - राम समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले असता गौरवने दीक्षाचा पाण्‍यात बुडवून खून केला होता. गौरवने पोलिसांना दिलेल्‍या माहितीप्रमाणे, किनाऱ्यावर ते दोघे बसलेले असताना त्‍यांच्‍यात वाद सुरू झाला.

त्‍या वादातूनच त्‍याने दीक्षाला पाण्‍यात बुडवले. ती मरून पडल्‍याचे समजल्‍यावर तेथून पळून जाण्‍याचा त्‍याने प्रयत्‍न केला. मात्र, किनाऱ्यावर असलेल्‍या काही पर्यटकांनी दीक्षाचा मृतदेह किनाऱ्यावर आल्‍याचे पाहिल्‍यावर या खुनाला वाचा फुटली होती. याच पर्यटकांनी पोलिसांना यासंबंधीची माहिती दिल्‍यानंतर पोलिसांनी गौरव याला ताब्‍यात घेतले.

चेन्नईच्‍या युवतीला साक्षीसाठी बोलावणार

पोलिस तपासात गौरव कटियार याचे लग्नापूर्वी चेन्नईतील एका युवतीशी प्रेमसंबंध असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणी कुंकळ्‍ळी पोलिस लवकरच चेन्नईतील त्‍या युवतीला गोव्‍यात साक्षीसाठी बोलावणार असल्‍याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zilla Panchayat Election: 'मागच्या दरवाजानं काँग्रेसमध्‍ये कुणालाही प्रवेश दिला नाही', जिल्हाध्यक्षांनी स्पष्टचं सांगितलं; सासष्टीतील पाचही जागांसाठी अर्ज दाखल

Zilla Panchayat Election: धारगळ मतदारसंघात काँग्रेसमध्‍ये उफाळला कलह, ऐनवेळी ज्ञानेश्‍‍वर शिवजी यांना उमेदवारी नाकारल्‍याने बंडाचा सूर

Goa Live Updates: 11 लाखांच्या अंमली पदार्थासह 44 वर्षीय व्यक्तीला अटक

Goa Banana Production: राज्यात नारळ, काजूपाठोपाठ केळीचे बंपर उत्पादन! तरीही महाराष्ट्र-कर्नाटकातून का करावी लागतेय आयात?

Goa Industrial Estate: भूजल प्रदूषणाचा धोका! श्रीस्थळ औद्योगिक वसाहतीत मळीच्या बेकायदेशीर विल्हेवाटीवर ग्रामस्थांचा संताप; प्रशासनाची तत्काळ कारवाई!

SCROLL FOR NEXT