Gas Cylinder Blast At Calangute Dainik Gomantak
गोवा

Calangute Cylinder Blast: कळंगुटमध्ये परप्रातियांच्या झोपडपट्टीत तीन सिलिंडरचा भीषण स्फोट; पत्र्याचे शेड जमीनदोस्त

दुर्घटनेत सुदैवाने जिवीतहानी झाली नाही

Rajat Sawant

Gas Cylinder Blast At Calangute : आगरवाडा कळंगुट येथे परप्रातियांच्या झोपडपट्टीत तीन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत एक नागरिक गंभीर जखमी झाला.

म्हापसा, पिळर्ण, पणजी येथील अग्निशामक दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कळंगुट आगरवाडा येथील परिसरात झोपडपट्ट्यांमध्ये परप्रांतिय राहतात. हा अपघात घडला तेथे 85 पेक्षा जास्त झोपडपट्ट्यां आहेत. यातील एका खोलीत तीन सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या अपघातानंतर एकच गोंधळ उडाला.

स्फोटाची माहिती मिळताच म्हापसा, पिळर्ण, पणजी येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या झोपडपट्ट्यांमध्ये जाण्याचा रस्ता अडणीचा असल्याने वाट काढत अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

या अपघातात एक जण भाजल्याची माहिती समोर येत आहे. जखमीला कांदोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. भीषण आगीत काही झोपड्या जमीनदोस्त झाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

Nicholas Pooran Century: 13 षटकार, 5 चौकार, 321 चा स्ट्राइक रेट… निकोलस पूरननं ठोकलं वादळी शतक; गोलंदाजांची काढली पिसं VIDEO

SCROLL FOR NEXT