Fuel Price Hike news, LPG Gas Price Hike,  Dainik Gomantak
गोवा

झळ! गॅस अन् इंधनाच्या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री

युरी: सरकार स्थापनेसही अकारण विलंब

दैनिक गोमन्तक

मडगाव: विधानसभा निवडणुकीनंतर लगेच पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरांत बेसुमार वाढ केल्याने भाजप सरकार लोकविरोधी असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटणारे भाजप सरकार असंवेदनशील आहे. भाजप नेत्यांच्या सोयीपेक्षा जनतेची सोय महत्त्वाची आहे. त्यासाठी गोव्यात सरकारने शपथविधी सोहळा तातडीने करावा, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस तथा आमदार युरी आलेमाव यांनी केली.

इंधन, गॅस दरवाढ, यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव आणि गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी एका संयुक्त निवेदनात भाजपवर टीका केली. (Fuel Price Hike news)

अवास्तव खर्च थांबवा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर भाजप नेत्यांच्या सोयीपेक्षा जनतेची सुविधा महत्त्वाची आहे. जनतेला ताबडतोब सरकार हवे आहे. शपथविधी सोहळ्यासारख्या कार्यक्रमांवर होणारा अवास्तव खर्च थांबवा, असे युरी आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT